किचन हे प्रत्येक घरात सर्वात महत्वाचे स्थान मानले जाते. स्वयंपाकघर म्हणजे केवळ स्वयंपाक करण्याची जागा नाही, तर ते माता अन्नपूर्णेचे स्थान मानले जाते. अशा परिस्थितीत, येथे घाण, कचरा किंवा दुर्गंधीयुक्त वस्तू ठेवल्याने नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आज आपण स्वयंपाकघरात डस्टबिन ठेवणे योग्य आहे का? याबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…
चुकूनही ‘या’ दिशेला डस्टबिन ठेवू नका
वास्तुशास्त्रानुसार, ईशान्य दिशेला चुकूनही डस्टबिन ठेवू नका, कारण ही दिशा सकारात्मक ऊर्जा आणि देवाचे स्थान मानले जाते. या दिशेला कचरा ठेवल्याने मानसिक तणाव, आर्थिक नुकसान आणि करिअरमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. तसेच, आग्नेय दिशेला डस्टबिन ठेवल्यास बचत संपते व कर्ज वाढू शकते. ईशान्य (उत्तर-पूर्व), उत्तर, आग्नेय आणि पूर्व दिशेला चुकूनही डस्टबिन ठेवू नका. या दिशांना कचरा ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा वाढते, नोकरी-व्यवसायात अडथळे येतात आणि आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते.
डस्टबिन ठेवण्यासाठी योग्य दिशा
वास्तुशास्त्रानुसार, चुकीच्या दिशेला डस्टबिन (कचराकुंडी) ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा, आर्थिक नुकसान आणि तणाव वाढू शकतो. डस्टबिन ठेवण्यासाठी नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) किंवा वायव्य (उत्तर-पश्चिम) दिशा सर्वात योग्य व शुभ मानली जाते, ज्यामुळे नकारात्मकता दूर राहते. उत्तर-पश्चिम दिशेला ठेवल्याने वास्तुदोष होत नाही,
वास्तुशास्त्रातील महत्त्वाचे नियम
- डस्टबिनला नेहमी झाकण असावे.
- कचरा रोजच्या रोज साफ करून डस्टबिन स्वच्छ ठेवावी.
- डस्टबिन कधीही मुख्य दरवाजासमोर किंवा प्रवेशद्वारावर ठेवू नये.
- घराच्या ब्रह्मस्थानावर (मध्यभागी) कधीही कचराकुंडी ठेवू नका.
- डस्टबिन नियमितपणे साफ करा आणि त्यातून येणाऱ्या दुर्गंधीपासून घराचे रक्षण करा, जेणेकरून घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहील.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





