घरात आणि ऑफिसमध्ये देवतांचे फोटो असणं शुभ मानलं गेलं आहे. मात्र काही देवी -देवतांचे फोटो किंवा मूर्ती अशा असतात, ज्या योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेलाच ठेवल्या गेल्या पाहिजेत. आज आपण ऑफीसमध्ये कोणत्या देवी देवतांचे फोटो लावू शकतो, याबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात….
ऑफिसमध्ये कोणत्या देवी-देवतांचे फोटो असावेत?
वास्तुशास्त्रानुसार ऑफिसमध्ये श्रीगणेश, देवी सरस्वती आणि माता लक्ष्मी यांचे फोटो लावणे शुभ मानले जाते. जेणेकरून कामाच्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी नांदेल.
गणपतीचा फोटो
श्रीगणेशाचा फोटो कामाच्या ठिकाणी अडथळे दूर करण्यासाठी आणि नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी गणपतीचा फोटो महत्त्वाचा आहे. “विघ्नहर्ता” म्हणून गणपती कार्यालयातील सर्व अडथळे दूर करतात आणि कामात यश देतात. त्यांची सोंड डावीकडे वळलेली असावी, असे सांगितले जाते. बुद्धी आणि संकटनाशक, कामाच्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा आणतात.
देवी लक्ष्मीचा फोटो
धन आणि समृद्धीची देवी म्हणून, लक्ष्मीचा फोटो व्यवसायात भरभराट आणतो. ऑफिसमध्ये लक्ष्मी मातेसोबत श्रीगणेश आणि सरस्वती मातेचा फोटो ठेवणे शुभ मानले जाते, ज्यामुळे ज्ञान आणि धन दोन्ही प्राप्त होते.
देवी सरस्वतीचा फोटो
ज्ञान आणि कलेची देवी असल्याने, सरस्वतीचा फोटो कामाच्या ठिकाणी एकाग्रता आणि सर्जनशीलता वाढवतो. वास्तुशास्त्रानुसार ऑफिसमध्ये देवी सरस्वतीचा फोटो लावणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण यामुळे सकारात्मक ऊर्जा, ज्ञान आणि कामात प्रगती होते, असे मानले जाते. विशेषतः गणपती आणि लक्ष्मीसोबत सरस्वतीचा फोटो ठेवल्यास कामाच्या ठिकाणी सुख-समृद्धी आणि यश मिळते, असे वास्तुशास्त्र सांगते.
या नियमांचे पालन केल्यास ऑफिसमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होऊन कामात प्रगती आणि धनलाभ होतो, असे वास्तुशास्त्र सांगते.
(टीप : वरील सर्व बाबी ‘MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)






