वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक ठिकाणाचा कोपरा आणि वस्तु सजवल्या जातात. घरातील कोणत्या दिशेला काय ठेवायचे हे देखील वास्तुशास्त्रानुसार ठरवले जाते. या प्रमाणेच घरातील झाडं आणि रोपंदेखील आपल्या आयु्ष्यावर नकळत प्रभाव टाकत असतात. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान विष्णु यांना निळं गोकर्णाचे फुल खूप प्रिय आहे. याला धन बेलदेखील म्हटलं जातं. गोकर्णाचे झाड कोणत्या दिशेने लावणे योग्य असतात, हे जाणून घेऊयात…
गोकर्णाचे रोप
गोकर्णाचे रोप घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते. यामुळे घरात शांतता आणि समृद्धी टिकून राहते. गोकर्णाचे रोप देवी लक्ष्मीला प्रिय आहे, त्यामुळे ते घरात लावल्याने देवी लक्ष्मीची कृपा राहते.
सकारात्मक ऊर्जा
गोकर्णाचे रोप योग्य दिशेला लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा, धन, समृद्धी आणि शांतता नांदते, असे मानले जाते. गोकर्णाचे रोप घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते. यामुळे घरात शांतता आणि समृद्धी टिकून राहते. गोकर्णाचे रोप घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते, ज्यामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होते.
ईशान्य दिशा
वास्तूनुसार, ईशान्य दिशा ही देव आणि संपत्तीची दिशा मानली जाते. या दिशेला गोकर्णाचे रोप लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात, असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, ईशान्य दिशा (उत्तर-पूर्व) ही देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचे निवासस्थान मानली जाते. त्यामुळे या दिशेला गोकर्णाचे रोप लावल्यास घरात सुख-समृद्धी येते.
आर्थिक लाभ
ईशान्य दिशेला गोकर्णाचे रोप लावल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात पैशाची आवक वाढते. गोकर्णाचे निळे फुलं देवी लक्ष्मीला फार प्रिय आहेत, त्यामुळे शुक्रवारी गोकर्णाचे निळे फुलं देवीला अर्पण केल्याने आर्थिक स्थैर्य वाढते. गोकर्णाचे रोप घरात लावल्याने धनसंपत्तीत वाढ होते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)






