Sankashti Chaturthi 2025 : संकष्टी चतुर्थीला नैवेद्यासाठी बनवा ‘दूधाचा पेढा’ पाहा सोपी रेसिपी…

Published:
संकष्टी चतुर्थीसाठी दुधाचा पेढा हा झटपट होणारा आणि चविष्ट नैवेद्य गणपतीला अर्पण करण्यासाठी उत्तम आहे, जो १० मिनिटांत तयार होऊ शकतो.
Sankashti Chaturthi 2025  : संकष्टी चतुर्थीला नैवेद्यासाठी बनवा ‘दूधाचा पेढा’ पाहा सोपी रेसिपी…

संकष्ट चतुर्थीच्या व्रतामध्ये विघ्ने दूर करणाऱ्या श्री गणेशाची पूजा केली जाते आणि चंद्रोदयाची वाट पाहून चंद्रदर्शन झाल्यावर व्रत सोडले जाते.. या दिवशी गणेशाची आराधना केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला खूप महत्त्व आहे. संकष्टीच्या दिवशी खास पदार्थ केले जातात. संकष्टी चतुर्थीच्या प्रसादामध्ये गोड पदार्थांना विशेष महत्त्व आहे. चला तर मग जाणून घेऊया दूधाचा पेढा या पदार्थाची रेसिपी…

साहित्य

मिल्क पावडर
साखर
दूध
तूप
वेलची पावडर 

कृती

  • एका भांड्यात मिल्क पावडर आणि साखर घ्या.
  • त्यात थोडे-थोडे दूध घालून घट्ट मिश्रण तयार करा.
  • एक कढई गरम करा, त्यात तूप घाला.
  • तयार झालेले मिश्रण तुपात घालून मंद आचेवर परता.
  • मिश्रण कढईला चिकटत नाही असे होईपर्यंत परता.
  • वेलची पावडर घाला आणि मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
  • मिश्रण थोडे कोमट झाल्यावर त्याचे छोटे-छोटे पेढे वळा.
  • तुमचा दुधाचा पेढा तयार आहे, गणपतीला नैवेद्य म्हणून अर्पण करा.