Sankashti Chaturthi 2025 : संकष्टी चतुर्थीला नैवेद्यासाठी बनवा गाजराचा हलवा; खवा न घालता 10 मिनिटात होणारी रेसिपी

Published:
सर्वांचे दुःख दूर करणाऱ्या विघ्नहर्ता गणपतीची आज संकष्टी चतुर्थी आहे. संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला गाजराच्या हलव्याचा नैवेद्य दाखवा. सोपी, स्वादिष्ट रेसिपी जाणून घ्या.
Sankashti Chaturthi 2025  : संकष्टी चतुर्थीला नैवेद्यासाठी बनवा गाजराचा हलवा; खवा न घालता 10 मिनिटात होणारी रेसिपी

संकष्टी चतुर्थीला महिला गणेशाची मनोभावे पूजा करून उपवास करतात. घरात सुख शांती लाभावी आणि कुटुंबातील सदस्यांना चांगले आरोग्य लाभावे हेच त्या मागील उद्देश असतो. संध्याकाळी चंद्राला पाहून देवाची पूजा करून उपवास सोडला जातो. देवाची पूजा करताना सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे नैवेद्य. नैवेद्यासाठी गाजराचा हलवाही झटपट करता येतो.  नैवेद्यासाठी हलवा केला तर सगळेच फार आवडीने खातील एवढे मात्र नक्की…

साहित्य

  • गाजर
  • अर्धा कप साखर
  • अर्धा कप दूध
  • वेलची पूड
  • तूप
  • दुधाची साय
  • ड्रायफ्रुट्स

कृती

  • सगळ्यात पहिले गाजर किसून घ्या. गाजर किसून झाल्यानंतर एका भांड्यात तूप घेऊन थोडे गरम झाल्यानंतर त्यात गाजराचा किस घालावा गाजर मऊ होईपर्यंत चांगले शिजवून घ्या.
  • गाजर चांगले शिजवून घेतल्यानंतर त्यात आता साखर घालावी आणि मध्यम आचेवर चांगले शिजवून घ्यावे.
  • साखरेला पाणी सुटल्यानंतर त्यातील पाणी थोडे सुकू द्यावे त्यानंतर त्यात दूध टाकावे आणि ड्रायफ्रुटचे तुकडे घालावे.
  • गाजराचा हलवा सुकत आल्यानंतर त्यात साय किंवा मिल्क पावडर घालून शिजवून घ्या.
  • तूप, सुकामेवा (ड्रायफ्रूट्स) आणि वेलची पावडर घालून चांगले परतून घ्या.
  • अशाप्रकारे तुमचा झटपट गाजराचा हलवा तयार होईल, जो तुम्ही संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी अर्पण करू शकता.