संकष्टी चतुर्थी असल्यानं गोड-धोड पदार्थ बनवून नैवेद्य अर्पण केला जातो. लाडक्या गणपती बाप्पाला खूश करण्यासाठी भाविक भक्तीभावानं विविध प्रकारचा नैवेद्य तयार करतात. गणपतीला वेगवेगळ्या प्रकार नैवेद्य अर्पण केला जातो. या खास दिवशी गोड पदार्थ तयार केले जातात. या गोड पदार्थांना नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. या दिवशी प्रसादासाठी तुम्ही देखील मोदक बनवू शकता. मोदक हा गणपतीचा सर्वात आवडता प्रसाद आहे.
साहित्य
- १ कप किसलेले खोबरे
- १/२ ते १ कप गूळ (आवडीनुसार)
- १/४ चमचा वेलची पूड
- बदाम,काजु (आवडीनुसार)
- १ कप तांदळाचे पीठ
- १.५ कप पाणी
- १/२ चमचा तूप
- चिमूटभर मीठ
कृती
- एका कढईत किसलेले खोबरे आणि गूळ एकत्र करा. गुळाचा पाक होईपर्यंत आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. ड्रायफ्रुट्स आणि वेलची पूड घालून मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
- एका पातेल्यात पाणी, तूप आणि मीठ घालून उकळी आणा. उकळी आल्यावर तांदळाचे पीठ घालून चांगले मिसळा आणि झाकण ठेवून एक मिनिट शिजवा. गॅस बंद करा आणि पिठाचा गरम गोळा जरा थंड होऊ द्या.
- तयार पिठाचे छोटे गोळे घ्या. हाताने किंवा साच्याने मोदकाचा आकार द्या. पिठाच्या पारीमध्ये तयार केलेले सारण भरा आणि मोदकाचा आकार बंद करा.
- चाळणीत ओले कपडे किंवा केळीचे पान ठेवा. त्यावर मोदक ठेवा आणि साधारण १०-१२ मिनिटे वाफवून घ्या.
- वाफवलेले मोदक गणपतीला नैवेद्य म्हणून अर्पण करा






