संकष्टी चतुर्थीला महिला गणेशाची मनोभावे पूजा करून उपवास करतात. घरात सुख शांती लाभावी आणि कुटुंबातील सदस्यांना चांगले आरोग्य लाभावे हेच त्या मागील उद्देश असतो. संध्याकाळी चंद्राला पाहून देवाची पूजा करून उपवास सोडला जातो. देवाची पूजा करताना सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे नैवेद्य. गणपतीला मोदक खूप आवडतात. मोदक हा गणपतीचा आवडता नैवेद्य आहे. असे मानले जाते की मोदक खाल्ल्याने गणपती प्रसन्न होतो. मोदक म्हणजे ‘आनंद’ आणि हे मोदक गणेशाला अर्पण केल्याने भक्तांना सुख आणि समृद्धी मिळते. संकष्टी पूजेच्या वेळी तुम्ही गणपतीला मोदकही अर्पण करू शकता. मोदक गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे. त्यामुळे आज आपण मोदकाचा नवीन प्रकार शिकूया…
साहित्य
- पांढरे तीळ
- गूळ
- तूप
- ड्रायफ्रुट्स
- वेलची पावडर
कृती
- मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम तुपामध्ये मंद आचेवर हलके तीळ भाजून घ्या.
- यानंतर भाजलेले तीळ मिक्सरला छान बारीक करून घ्या.
- आता तिळामध्ये गूळ घालून विरघळेपर्यंत ढवळत रहा.
- त्यानंतर यात तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्सची पावडर आणि वेलची पावडर घालावी.
- हे मिश्रण छान घट्ट एकजीव करून घ्या.
- आता हे मिश्रण मोदकाच्या साच्यात भरून मोदक तयार करून घ्यावे.
- स्वादिष्ट गोड तिळगुळाचे मोदक तयार झाले.






