श्रावणात महादेवांची पूजा भक्त मोठ्या भक्तीभावाने करत असतात. श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेसाठी सर्वात शुभ मानला जातो. तर यावर्षी 25 जुलै 2025 रोजी श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिना पवित्र महिना आणि शिवभक्तांसाठी तर त्यांच्या आराध्य महादेवांना प्रसन्न करण्याचा महिना आहे. यंदा श्रावण महिन्यात पहिल्याच दिवशी शंकराची पूजा कशी करावी हे जाणून घेऊयात…
श्रावण महिन्याचे महत्त्व
श्रावण महिना भगवान शिव यांना अत्यंत प्रिय आहे. यामुळेच या काळात महादेवाची पूजा करण्याचं विशेष महत्त्व आहे. भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात. या महिन्यात महादेवाची पूजा केल्याने सुख-समृद्धी, आरोग्य आणि मनोकामना पूर्ण होतात.
हे ही वाचा
1घरात चुकूनही आणू नका या देवाची मूर्ती; अन्यथा होईल मोठं नुकसान
2Mahashiratri 2026 : महाशिवरात्रीला महादेवाला अर्पण करा ‘थंडाई’; भोलेनाथ होतील प्रसन्न, जाणून घ्या पौराणिक महत्त्व…
3Shani Pradosh 2026 : शनि प्रदोष विशेष! शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी ‘या’ काळात करा हनुमान चालीसा पठण..
4Shani Pradosh Vrat 2026 : ‘शनि प्रदोष व्रत’ शिव आणि शनिदेवाच्या कृपेसाठी करा ‘हे’ विशेष उपाय..
शिवपूजेसाठी आवश्यक साहित्य
- शुद्ध पाणी किंवा गंगाजल
- दूध, दही, तूप, मध आणि साखर (पंचामृतासाठी)
- बेलपत्र, धोत्रा, आघाड्याची फुले
- तांदूळ, रोळी, मौली (पवित्र धागा), फळे, फुले
- दिवा, अगरबत्ती, कापूर
- धूप, चंदन
- नारळ आणि मिठाई