MP Breaking News
Tue, Dec 16, 2025

रुद्राक्षाची उत्पत्ती कशी झाली? रुद्राक्ष परिधान केल्याने काय फायदा होतो?

श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या पूजेला विशेष महत्त्व आहे, आणि या काळात रुद्राक्ष धारण करणे अत्यंत शुभ मानले जाते.
रुद्राक्षाची उत्पत्ती कशी झाली? रुद्राक्ष परिधान केल्याने काय फायदा होतो?

श्रावणात महादेवांची पूजा भक्त मोठ्या भक्तीभावाने करत असतात. श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेसाठी सर्वात शुभ मानला जातो. तर यावर्षी 25 जुलै 2025 रोजी श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिना पवित्र महिना आणि शिवभक्तांसाठी तर त्यांच्या आराध्य महादेवांना प्रसन्न करण्याचा महिना आहे.  अनेक लोक या महिन्यात रुद्राक्ष धारण करतात. रुद्राक्षाची उत्पत्ती कशी झाली? त्यामागे कोणती पौराणिक कथा आहे. जाणून घेऊयात…

रुद्राक्षाची उत्पत्ती कशी झाली?

पौराणिक कथेनुसार, भगवान शंकराच्या डोळ्यातून अश्रू जमिनीवर पडले आणि त्यातून रुद्राक्षाची उत्पत्ती झाली. या कथेनुसार, भगवान शिव जेव्हा खूप दिवसांच्या ध्यानातून जागे झाले, तेव्हा त्यांचे अश्रू जमिनीवर पडले आणि त्यातून रुद्राक्षाची झाडे उगवली,  ‘रुद्र’ म्हणजे शिव आणि ‘अक्ष’ म्हणजे डोळा, त्यामुळे रुद्राक्ष म्हणजे ‘शिवाचे डोळे’ किंवा ‘शिवाचे अश्रू’ असे मानले जाते.

दुसरी एक कथा अशी आहे की, जेव्हा माता सतीने आत्मदहन केले, तेव्हा भगवान शिव खूप दुःखी झाले आणि ते माता सतीच्या शरीराला घेऊन तिन्ही लोकांमध्ये फिरत होते. त्यावेळेस, जिथे-जिथे त्यांचे अश्रू पडले, तिथे-तिथे रुद्राक्षाची झाडे उगवली. या दोन्ही कथांनुसार, रुद्राक्ष हे भगवान शंकराच्या अश्रूंमधून निर्माण झाले आहे आणि ते भगवान शंकराचे प्रतीक मानले जाते.

रुद्राक्षाचे महत्त्व

रुद्राक्ष भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे आणि ते धारण केल्याने शंकराचा आशीर्वाद मिळतो. रुद्राक्षाचे प्रत्येक मुख विशिष्ट फलदायी मानले जाते. एकमुखी रुद्राक्ष भगवान शंकराचे प्रतीक आहे आणि 2, 3, 4 अशा मुखांचे रुद्राक्ष वेगवेगळ्या राशी आणि ग्रहांशी संबंधित आहेत. रुद्राक्ष धारण केल्याने कामात यश मिळते आणि जीवनात समृद्धी येते. रुद्राक्ष हे पवित्र मानले जाते आणि त्याचा उपयोग धार्मिक कार्यांसाठी, जसे जप, ध्यान, इत्यादींसाठी केला जातो. 

रुद्राक्ष म्हणजे काय?

रुद्राक्ष म्हणजे भगवान शंकराच्या अश्रूंपासून बनलेले एक फळ. त्याला ‘रुद्राक्ष’ असे नाव ‘रुद्र’ आणि ‘अक्ष’ (नेत्र/अश्रू) या दोन शब्दांपासून मिळाले आहे.

रुद्राक्ष परिधान करण्याचे फायदे

  • नकारात्मक ऊर्जा कमी होते
    रुद्राक्ष नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतो. ज्यामुळे व्यक्तीला शांत आणि स्थिर वाटते.

  • मानसिक शांती
    रुद्राक्ष धारण केल्याने मन शांत होते आणि तणाव कमी होतो. 

  • आरोग्य सुधारते
    रुद्राक्ष रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि इतर शारीरिक समस्यांवर मात करण्यास मदत करतो. रुद्राक्ष रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास, हृदयविकार आणि इतर शारीरिक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मदत करतो.

  • आत्मिक शांती
    रुद्राक्ष आत्मिक शांती आणि आध्यात्मिक विकासासाठी उपयुक्त आहे. 

  • भाग्य
  • रुद्राक्ष धारण केल्याने भाग्य उजळते, असे मानले जाते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)