शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, ‘बरेच लोक तक्रार करतात की खूप पैसे कमावले तरीही घरात पैसा टिकून राहात नाही. खरंतर, तुमच्या घरातील वास्तुदोषांमुळे असे घडते. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराची रचना योग्य प्रकारे असावी, जेणेकरून कोणतीही समस्या उद्भवणार नाही. आपण आपल्या स्वयंपाकघरात काही चुका करतो. जे आपण टाळले पाहिजे. वास्तुशास्त्र आणि हिंदू मान्यतेनुसार, स्वयंपाकघरात अशी अनेक भांडी आहेत जी उलटी ठेवणे अशुभ मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया ती भांडी कोणती आहेत आणि ती उलटी ठेवल्यास काय होते…
कोणती भांडी उलटी ठेवू नयेत?
तवा
वास्तुशास्त्रानुसार अनेक वेळा स्त्रिया पोळी बनविल्यानंतर धुतलेला तवा उलटा ठेवतात. स्वयंपाकघरातील तवा उलटा ठेवू नये. असे मानले जाते की तवा उलटा ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते, वास्तुदोष निर्माण होतो आणि कुटुंबात आर्थिक अडचणी व कामात अडथळे येतात. त्यामुळे तवा कधीही उलटा न ठेवता योग्य दिशेने ठेवावा.
कुकर
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात कुकर उलटे ठेवू नये, कारण असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, वास्तुदोष निर्माण होतात आणि घरातील शांतता व लक्ष्मीचा वास निघून जातो, असे मानले जाते. त्यामुळे ही भांडी वापरल्यानंतर लगेच स्वच्छ करून योग्य जागी ठेवावीत.
कढई
कढई हे अन्नपूर्णा आईचे सर्वात आवडते भांडे मानले जाते. त्यामुळेच प्रत्येक सण किंवा आनंदाच्या प्रसंगी घरातील चुलीवर कढई ठेवण्याची श्रद्धा शतकानुशतके चालत आली आहे. कढई उलटी ठेवू नये कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे राहूचा प्रभाव देखील वाढू शकतो. घरात शांतता व समृद्धीसाठी कढईचा वापर केल्यानंतर ती स्वच्छ धुवावी आणि रात्री व्यवस्थित तिच्या जागेवर ठेवावी, असे वास्तुशास्त्र सांगते.
भांडी उलटे न ठेवण्याचे कारण
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात भांडी उलटी ठेवू नयेत. स्वयंपाकघरात भांडी उलटी ठेवल्यास कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात. घरात अशांततेचे वातावरण निर्माण होते आणि नेहमी कलहाची परिस्थिती असते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)






