हिंदू धर्मात नारळाला अत्यंत महत्व आहे. नारळ कोणत्याही शुभ प्रसंगी पूजला जातो आणि नारळ देवाची पूजा करून फोडला जातो. कोणत्याही देव-देवतांच्या पूजेसाठी नारळ हा लागतोच. नारळाविना पूजा ही अपूर्णच मानली जाते. पण महिला पूजा किंवा शुभ कार्यात वापरला जाणारा नारळ का फोडू शकत नाहीत? यामागे नेमकं कारण काय आहे याबद्दल जाणून घेऊयात…
पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू या तीन वस्तू आणल्या. या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान आहेत. याच कारणामुळे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. नारळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे निवासस्थान मानले जाते. तीन देवतांच्या उपस्थितीमुळे नारळ महिलांपासून दूर ठेवला जातो. नारळ हे भगवान विष्णूने पृथ्वीवर पाठवलेले फळ मानले जाते. जो देवी लक्ष्मीचा अधिकार आहे. म्हणूनच देवी लक्ष्मीशिवाय कोणतीही स्त्री नारळ फोडू शकत नाही. नारळ हे बीजस्वरूप मानले जाते आणि स्त्री बीजस्वरूपात अर्भकाला जन्म देते, म्हणून महिलांनी नारळ फोडू नये असे मानले जाते.
‘या’ कारणांमुळे महिला नारळ फोडत नाहीत
नारळ हे बीज फळ आहे. स्त्री बीजाच्या रूपात मुलाला जन्म देते. म्हणून, नारळ गर्भधारणेशी संबंधित इच्छा पूर्ण करण्यास सक्षम मानला जातो. यामुळेच महिलांसाठी नारळ फोडणे निषिद्ध मानले जाते. मानले जाते की जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर तिच्या मुलाला त्रास होतो.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)





