Marathi News

मुस्लीम बांधवांना बकरी ईदच्या ‘अशा’ द्या खास शुभेच्छा…

Published:
आपला देश विविध जातींनी, धर्मांनी नटलेला आहे. प्रत्येक धर्मांचे सण-उत्सव अगदी आनंदात साजरे केले जातात. तर, यंदा आपल्या मुस्लीम बांधवांना अशा द्या बकरी ईदच्या खास शुभेच्छा
मुस्लीम बांधवांना बकरी ईदच्या ‘अशा’ द्या खास शुभेच्छा…

आपला देश विविध जातींनी, धर्मांनी नटलेला आहे. प्रत्येक धर्मांचे सण-उत्सव अगदी आनंदात साजरे केले जातात. आज भारतात 7 जून रोजी बकरी ईद साजरी करण्यात येणार आहे. बकरीद ईद म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. देशात आणि जगभरात मुस्लिम बांधव या दिवशी नमाज पठण करतात. पैगंबर इब्राहीम यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आजच्या दिवशी बकऱ्यांची कुर्बानी दिली जाते. त्याग आणि समर्पणाचा दिवस म्हणूनही या दिवसाकडे पाहिले जाते. या दिवशी मुस्लिम बांधव एकमेकांची गळाभेट घेतात. एकमेकांसाठी दुवा करतात आणि एकमेकांना शुभेच्छा संदेशही देतात. तर, यंदा आपल्या मुस्लीम बांधवांना अशा द्या बकरी ईदच्या खास शुभेच्छा…

बकरी ईदच्या शुभेच्छा

  • बंधुत्वाचा संदेश देऊया विश्व बंधुत्व वाढीस लावूया बकरी ईद दिवशी हीच धरुनी मनी इच्छा, सर्व मुस्लिम बांधवांना, बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा!

  • तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी ही बकरी ईद सुख समृद्धी आणि भरभराटी घेऊन येवो हीच शुभेच्छा! बकरी ईदच्या शुभेच्छा!

  • त्याग, समर्पण आणि कर्तव्यभावनेची शिकवणूक देणारा दिवस म्हणजेच ईद-उल-अज़हा (बकरी ईद). या पवित्र सणाच्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा.

  • ईद-उल-अजहाच्या मनापासून शुभेच्छा! तुमचा प्रत्येक दिवस श्रद्धा, शांतता आणि बरकतीने भरलेला असो.

  • “अल्लाह तुमची कुर्बानी स्वीकारो आणि तुम्हाला त्याच्या दैवी कृपेने आशीर्वाद देवो. ईद मुबारक!”

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews