Bhogi 2026 Best Wishes : मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला ‘भोगी’ असे म्हटले जाते. भोगी म्हणजे उपभोग घेणे असे म्हणतात. यादिवशी अन्नाचा उपभोग घ्यावा अशी समजूत आहे. हा सण प्रामुख्याने निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि देवराज इंद्राची आराधना करण्याचा दिवस आहे. पावसाचा देव मानल्या जाणाऱ्या इंद्राने पृथ्वीवर चांगली सुबत्ता आणि पीकपाणी द्यावे, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. शेतातील नवीन पिकांच्या कापणीचा हा काळ असल्याने, शेतकरी या दिवशी निसर्गाचा आनंद साजरा करतात. या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करण्याची आणि जुन्या व टाकाऊ वस्तूंची होळी पेटवून नवीन वर्षाचे स्वागत करण्याची परंपरा अनेक भागांत पाहायला मिळते.
भोगी दिवशी या भाज्यांची भाजी करतात
भोगीच्या दिवशी अन्नाचे अनन्यसाधारण महत्त्व असते. या दिवशी ‘भोगीची भाजी’ किंवा ‘लेकुरवाळी भाजी’ बनवण्याची विशेष परंपरा आहे. यामध्ये वांगी, पावटा, हरभरा, गाजर, घेवडा, बोरे आणि शेंगदाणे अशा ऋतूमानानुसार उपलब्ध असणाऱ्या सर्व भाज्यांचा समावेश केला जातो. याभाज्या एकत्र करून त्याची भाजी बनवतात व तिला भोगीची भाजी असे म्हंटले जाते. याच भाजीचा नैवेद्य देवाला दाखवून हा सण साजरा केला जातो. या भाजीसोबत तिळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी आणि मुगाची खिचडी असा पौष्टिक बेत घरोघरी असतो. या खास दिवशी येथे दिलेले संदेश पाठवून तुमच्या प्रियजनांना द्या खास शुभेच्छा…Bhogi 2026 Best Wishes
भोगी निमित्त शुभेच्छा (Bhogi 2026 Best Wishes)
आपणांस व आपल्या परिवारास
भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
——————————————-
नवीन वर्षातील पहिला सण
भोगी आणि मकरसंक्रांतीच्या
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा!
——————————————-
नवीन वर्षातील पहिला सण
तुमच्या आयुष्यात नेहमीसाठी
आनंद अन् उत्साह घेऊन येवो
भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
——————————————-
तीळ आणि गुळासारखी रहावी
आपली मैत्री घट्ट आणि मधुर
नात्यातील कटुता इथेच संपवा
पहिला सण करूया सुमधूर
भोगी आणि मकरसंक्रांती सणाच्या शुभेच्छा
——————————————-
हिरवागार हरभरा
गुलाबी थंडी, लाल गाजर
तीळ अन् बाजरीची भाकर,
भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा
———————————————
मेव्याचा आस्वाद भरभरून लाभो
आपले जीवन सदैव निरोगी राहो
भोगी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
——————————————
दु: ख असावे तीळा सारखे
आनंद असावा गुळासारखा
जीवन असावे तीळगुळासारखे
भोगी व मकर संक्रांत सणाच्या
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!
——————————————
भोगीची भाजी आरोग्यदायी चवदार
सोबत तीळ आणि बाजरीची भाकर
भोगीनिमित्त आनंद होवो द्विगुणित
अन् सर्व दु:खांचा पडो विसर
भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा
——————————————-
भोगीच्या भाजीची चव असते न्यारी…
सर्व सणांमध्ये मनमोहक असते भोगीची तयारी…
भोगी सणाच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!
——————————————-
नाते अपुले हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत
अधिकाधिक दृढ करायचे…
भोगी आणि मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
——————————————-






