Brahma Kamal Vastu Tips: ब्रम्हकमळ एक अद्भूत फूल आहे. हे फूल वर्षात एकदा उमलतं. जे कोणी या फुलाचं दर्शन करतात त्यांचं नशीब पालटतं. हिमालय भागात हे फूल विशेषपणे उमलतं. पांढऱ्या रंगाचं कमळासारखं दिसणारं हे फूल अत्यंत सुंदर दिसतं. साधारण जुलै ते सप्टेंबरच्या कालावधीत हे फूल उमलतं. आणि लगेचच कोमेजतं. बद्रीनाथ मंदिरात ब्रम्हकमळाचं भगवान बद्री नारायणाच्या पुजेत अर्पण केलं जातं. ज्योतिष आणि वास्तूनुसार, ब्रम्हकमळ फूल घरात लावणं शुभ मानलं जातं.
घरात ब्रम्हकमळ लावण्याचे फायदे
ब्रम्हकमळ घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि सुख समृद्धी राहत. ब्रम्हकमळ हे खूप कालावधीसाठी उमलतं. त्यामुळे अनेक ठिकाणी हे प्रकरण रहस्यमय आणि दिव्य मानलं जातं. ब्रम्हकमळ फुलाचं एकदाच दर्शन घेतल्याने नशीब चमकतं आणि मानसिक शांतता मिळते. ब्रम्हकमळ वास्तुनुसार घरात लावल्याने घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढतं. कुटुंबातील व्यक्तींचं नशीब बदलायला लागतं. लक्ष्मीची विषेष कृपा असते आणि धन आयात होऊ लागतं.
हे ही वाचा
ब्रम्हकमळ कोणत्या दिशेला लावावे
वास्तुनुसार, घराच्या उत्तर-पूर्व दिशेला म्हणदेच ईशान्य दिशेले ब्रम्हकमळ लावायला हवं. असं करणं शुभ मानलं जातं. मंदिर किंवा पूजाघराजवळ हे फूल ठेवणे लाभकारी मानलं जातं. ब्रह्मकमळाचा सुगंध आणि आभा घरात सकारात्मकता आणते. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. घराची वास्तु सुधारण्यासाठी आणि आईचा आशीर्वाद मिळविण्यासाठी घरात ब्रह्मकमल लावालं.
ब्रम्हकमळाबाबत पौराणिक कथा
ब्रम्हकमळाबाबत एक पौराणिक कथा आहे की, ब्रम्ह देव ध्यान करताना झोपले आणि जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा ते कमळ झाले होते. असं कमळाचं फूल ब्रम्हकमळ नावाने ओळखलं जातं. कथांनुसार, विष्णूंनी या फुलाचा उपयोग करून ते पत्नी देवी लक्ष्मीला पुन्हा जिवंत करू शकले. सृष्टीची उत्पत्तिदेखील ब्रम्हकमळातून झाल्याची मान्यता आहे. या प्रकारे ब्रम्ह देवाचं प्रिय फूल ब्रम्हकमळ मानलं जात आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)