Marathi News

Chanakya Niti: शत्रूंवर मात करायचीय??मग या चाणक्य नीतीचा अवलंब कराच

Published:
आचार्य चाणक्यांच्या मते शत्रूला कधीही हलके समजू नये. कारण त्याचा एकमेव उद्देश तुम्हाला कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचवणे असते.
Chanakya Niti: शत्रूंवर मात करायचीय??मग या चाणक्य नीतीचा अवलंब कराच

आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महान रणनीतीकार आणि धोरणकर्ते मानले जातात. चाणक्यांची धोरणे आजही राजकारण, प्रशासन आणि जीवनात मार्गदर्शक म्हणून काम करतात. माणसाने जीवन जगत असताना कोणत्या तत्त्वांचे पालन करावे? जीवनात यशस्वी होण्यासाठी काय करावे याबाबत आचार्य यांनी चांगले मार्गदर्शन केले आहे ज्याचा आजही मनुष्याला उपयोग होतो.

काय सांगते चाणक्यनीति? Chanakya Niti

चाणक्य यांनी त्यांच्या धोरणांमध्ये शत्रूंना तोंड देण्यासाठी अनेक नीती सुद्धा सांगितल्या आहेत. जर कठीण काळात ही तत्त्वे स्वीकारली तर कोणताही शत्रू तुमचे नुकसान करू शकत नाही. आचार्य चाणक्यांच्या मते शत्रूला कधीही हलके समजू नये. कारण त्याचा एकमेव उद्देश तुम्हाला कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचवणे असते म्हणून नेहमी सतर्क रहा आणि तुमच्या रणनीतीवर ठाम रहा.

जर तुमचा शत्रू तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली असेल तर त्याला पराभूत करण्यासाठी तुम्ही अनुकूल वर्तन स्वीकारले पाहिजे. जर तो वाईट स्वभावाचा असेल तर तुम्ही त्याच्याविरुद्ध थेट कारवाई केली पाहिजे. दुसरीकडे, जर शत्रू तुमच्याइतकाच बलवान असेल तर त्याला नम्रता किंवा बळाच्या सहाय्याने पराभूत केले जाऊ शकते.

जेव्हा तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्याला तोंड देत असता तेव्हा भावनांमध्ये वाहून जाण्याऐवजी तुम्ही संयमाने वागले पाहिजे. यामुळे तुम्हाला परिस्थिती समजून घेण्यास आणि योग्य निर्णय घेण्यास मदत होते. संयम तुम्हाला अनावश्यक नुकसानापासून देखील वाचवतो.

घाई गडबड करू नका –

महत्त्वाची बाब म्हणजे कोणतीही कॉल उचलण्यापूर्वी मला अनुकूल अशी वेळ निवडा… विचार न करता घाईगडबडीत कोणते निर्णय घेऊ नका अन्यथा निकाल तुमच्यावरच उलटण्याची शक्यता असते. जेव्हा तुम्हाला शत्रूविरुद्ध योजना बनवायची असते तेव्हा ती योग्य वेळी अंमलात आणा.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews