Chanakya Niti: चाणक्य नीतीनुसार चुकूनही कोणासमोर बोलू नका ५ गोष्टी, घेऊ शकतात गैरफायदा

Published:
आचार्य चाणक्य हे प्राचीन काळातील एक विद्वान, धोरणकर्ते आणि राजकारणी होते. त्यांनी लोकांना कसे वागावे, कसे वागू नये याबाबत अनेक नियम सांगितले आहेत.
Chanakya Niti: चाणक्य नीतीनुसार चुकूनही कोणासमोर बोलू नका ५ गोष्टी, घेऊ शकतात गैरफायदा

Chanakya Niti in Marathi:    आचार्य चाणक्यांनी आपल्या ‘नीतिशास्त्र’ या ग्रंथामध्ये समाज, राजकारण, करिअर, वैवाहिक आयुष्य अशा विविध विषयांबाबत महत्वाचे सल्ले दिले आहेत. यालाच आज चाणक्य नीती म्हणून ओळखले जाते. लोक आजही आपल्या अडचणी दूर करण्यासाठी चाणक्य नीतीचा अवलंब करतात.

आचार्य चाणक्य हे प्राचीन काळातील एक विद्वान, धोरणकर्ते आणि राजकारणी होते. त्यांनी लोकांना कसे वागावे, कसे वागू नये याबाबत अनेक नियम सांगितले आहेत. असे म्हटले जाते कि आचार्य चाणक्यांच्या नियमांचे पालन केल्यास यश नक्की मिळते. त्यामुळे अनेकजण आपल्या विविध अडचणी दूर करण्यासाठी चाणक्य नीतीचा वापर करतात. आज आपण चाणक्य नीतीनुसार आपल्या कोणत्या गोष्टी दुसऱ्यांसमोर बोलायच्या नाहीत याबाबत जाणून घेणार आहोत….

 

कौटुंबिक वादविवाद-

आचार्य चाणक्यांच्या मते, प्रत्येक कुटुंबामध्ये लहान-मोठे वादविवाद होत असतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरातील वाद बाहेर इतरांसमोर अजिबात बोलू नयेत. कारण असे केल्याने ते लोक तुमचा गौरफ़ायदा घेऊन तुमच्यात आपापसांत आणखी वाद निर्माण करू शकतात.

 

पती-पत्नीमधील गोष्टी-

आचार्य चाणक्यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने आपल्या वैवाहिक आयुष्यातील गोष्टी कधीही कोणासमोर बोलू नयेत. कारण असे केल्याने तुम्हाला पुढे अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

 

अपमान झाल्यास सांगू नये-

चाणक्य नीतीनुसार जर कोणी कधी तुमचा अपमान केला असेल तर अशा गोष्टी इतरांसमोर बोलू नयेत. कारण अनेकदा अशा व्यक्ती तुमच्या समोर तुम्हाला दिलासा देतील. परंतु माघारी तुमच्यावर हसतील आणि तुम्हाला त्याच नजरेतून बघायला सुरुवात करतील.

 

तुमच्यातील कमतरता-

चाणक्य नीतीनुसार आपल्यामध्ये असलेली कमतरता कधीही दुसऱ्यांसमोर सांगू नये. असे केल्याने अनेक लोक तुमचा गैरफायदा घेऊ शकतात. स्टिच असे केल्याने तुम्ही त्यांच्या नजरेत कमकुवत बनता.

 

तुमच्या कार्यक्षेत्रातील योजना-

प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता प्रतिस्पर्धी असतो. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रातील योजना कधीही कोणासोबत शेअर करू नका. असे केल्याने काही लोक तुम्हाला अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)