सध्या कलियुग सुरू आहे. या कलियुगात अनैतिक संबंधांचे (Chanakya Niti On Extramarital Affairs) प्रमाण खूपच वाढलेल आहे. आजकाल तर लग्न झालेले नवरा बायको सुद्धा इतर परपुरुषाशी आणि महिलांशी अनैतिक संबंध ठेवताना पाहायला मिळत आहे. अनैति संबंधातून आजवर अनेकदा गुन्हेगारीच्या जसे की मर्डर मारा अशा घटना घडताना दिसत आहेत. तसेच या विवाहबाह्य संबंधांमुळे नवरा बायकोचे नाते ही तुटत आहे. परंतु मित्रांनो एखादा माणूस लग्न झाल्यानंतर दुसऱ्या महिलेच्या प्रेमात का पडतो हे तुम्हाला माहिती आहे का?? आचार्य चाणक्यांनी आपल्या चाणक्य नीति मध्ये यामागची कारणे सांगितले आहेत.
पती आपल्या पत्नीपासून दूर का जातो? Chanakya Niti On Extramarital Affairs
विवाहित पुरुष इतर महिलांकडे आकर्षित होतात किंवा विवाहबाह्य संबंध का ठेवतात यामागची मुख्य कारणे म्हणजे लवकर लग्न करणे, इच्छा नसताना किंवा घरातील लोकांच्या जबरदस्तीमुळे लग्न करणे, नवरा बायको मधील शारीरिक फरक, वयातील अंतर, राहणीमानातील बदल, आत्मसंयमाचा अभाव आणि वाईट संगत यासारख्या कारणांमुळे विवाहित पुरुष आपल्या पत्नींना सोडून इतर महिलांकडे आकर्षित होतात. अशा विवाहबाह्य संबंधांमुळे अनेकांचा संसार मोडला आहे. अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. अनेकांचा तर जीवही गेला आहे.
कारण म्हणजे इच्छा नसताना लग्न –
आजकाल अनेकदा इच्छा नसताना काही जणांना लग्न करावं लागतं. कॉलेजमध्ये असताना प्रेम एकीवर असतं आणि लग्न मात्र दुसरी बरोबरच होतं. त्यामुळे नवऱ्याचे बायकोवर प्रेम राहतच नाही. नवऱ्याचा जीव हा त्याच्या जुन्या प्रेयसीमध्ये अडकलेला असतो. साहजिकच लग्नाच्या काही दिवसानंतरच नात्यांमध्ये तरी निर्माण होते आणि व्यक्ती दुसऱ्या महिलेशी विवाहबाह्य संबंध ठेवतो. Chanakya Niti On Extramarital Affairs
या पद्धतींनी नाते जपा
चाणक्य नीति पती-पत्नीमधील नाते कसे मजबूत करावे आणि ते तुटण्यापासून रोखावे याचे मार्ग देखील सांगते. चाणक्यनिती नुसार, नवरा बायको मध्ये संवाद हा मजबूत असावा. जर काही अडचणी असतील किंवा मतभेद असतील तर ती चर्चेतून सोडवली जाऊ शकतात. पती-पत्नीमधील प्रेम टिकवून ठेवण्यासाठी, छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणे आणि एकमेकांना समजून घेणे आणि एकमेकांसोबत वेळ घालवणे देखील महत्त्वाचे आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





