आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महान रणनीतीकार आणि धोरणकर्ते मानले जातात. आचार्य चाणक्यांनी त्यांच्या चाणक्य नीतित अनेक महत्त्वाचे सल्ले (Chanakya Niti To Become Rich) दिलेले आहेत तसेच जीवनावश्यक गोष्टींबाबत मार्गदर्शन केलं आहे. माणसाने आयुष्य कशाप्रकारे जगावे?? आयुष्यात कोणत्या गोष्टी गरजेचे असतात ??गरीब आणि श्रीमंत यांच्यातील भेद कसा समजतो…. यांसारख्या अनेक विषयावर चाणक्यांनी लिखाण केल आहे… आचार्य चाणक्य यांनी श्रीमंत होण्याचा मार्गही आपल्या चाणक्य नीतीत सांगितला आहे… मनुष्याने श्रीमंत होण्यासाठी नेमकं काय करावे?? कोणत्या गोष्टी टाळाव्या ??याबाबत चाणक्यांनी काही अचूक सल्ले दिले आहेत…. चला तर आपण सविस्तर जाणून घेऊया
1) आळशीपणा सोडा – Chanakya Niti To Become Rich
आचार्य चाणक्यांच्या मते जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर सर्वात आधी तुमच्या शरीरातील आळशीपणा सोडायला पाहिजे. जो व्यक्ती नियोजित कामे पुढे ढकलतो.. कोणतीही कामे करायला आळस करतो अशी व्यक्ती आयुष्यात कधीच श्रीमंत होऊ शकत नाही .अशा लोकांच्या हातात कधीही लक्ष्मी खेळत नाही. त्यामुळे चाणक्य नीतीनुसार जो मनुष्य मेहनती असतो, कष्टाळू असतो, वेळेचे महत्व जाऊन नियोजित कामे पूर्ण करतो अशी लोकं अत्यंत कमी वेळेत श्रीमंत होऊ शकतात.
2) वाईट संगत
आपल्या आयुष्यात संगतीला खूप महत्त्व आहे. आचार्य चाणक्यांच्या मते जो माणूस वाईट संगतीला जातो त्याच्यापासून लक्ष्मी सुद्धा दूर जाते. वाईट संगती मुळे फक्त पैशाचीच बरबादी होत नाही, तर समाजामध्ये तुमची किंमत आणि प्रतिष्ठाही जाते. वाईट संगत असलेल्या लोकांच्यात राहिल्याने चुकीच्या मार्गाला पैसे खर्च होत राहतात आणि तुम्ही श्रीमंत होण्याऐवजी दिवसेंदिवस गरिबीच्या दिशेने वाटचाल करत राहता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ते कधी कळतही नाही . त्यामुळे चाणक्य नीति नुसार मनुष्याने श्रीमंत होण्यासाठी वाईट संगत सोडली पाहिजे.
3) पैशाचा चुकीचा वापर टाळा
आपल्या आयुष्यात पैसा खूप महत्त्वाचा आहे…. जेव्हा तुम्ही कमवलेल्या पैशाचा चांगल्या गोष्टींसाठी उपयोग करता तेव्हा तो पैसा फळाला लागतो. परंतु हाच पैसा जर चुकीच्या मार्गासाठी वापरला तर मात्र तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येते…. त्यामुळे चाणक्यनीतीनुसार पैशाचा वापर जपून आणि विचारपूर्वक करावा . जेवढे पैसे तुमच्याकडे आहेत त्यात वाढ कशी होईल याचा विचार करा . जिथे गरज नाही तिथे वायफळ पैसा खर्च करू नका. अनावश्यक ठिकाणी मोठेपणा सिद्ध करण्यासाठी वारेमाप पैसा खर्च केल्यास तुम्ही गरिबी कडे ढकलू शकता…
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






