नवरात्री हा देवी उपासनेचा सर्वात महत्वाचा सण मानला जातो. या नऊ रात्रींमध्ये दुर्गा देवीच्या नऊ स्वरूपांची पूजा केली जाते. प्रत्येक दिवसाला एक वेगळे रूप आणि त्यामागे दडलेले तत्त्वज्ञान असते. दुर्गेची उपासना केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात, आत्मविश्वास वाढतो आणि मनाला शांती मिळते. भक्तीभावाने केलेल्या पूजेमुळे दैवी शक्तीचे संरक्षण लाभते. नवरात्रीत उपवास, जप, कीर्तन, आरती आणि भजन यांचा विशेष महत्त्व असतो. देवीची कृपा लाभल्याने ज्ञान, संपत्ती, आरोग्य आणि सुख प्राप्त होते. याकाळात जर तुम्ही दुर्गादेवीच्या 108 नावांचा जप केला, तर मात्र तुम्हाला त्यातून विशेष लाभ होऊ शकतो.
दुर्गादेवीच्या पुजेचे महत्व
नवरात्री हा देवी उपासनेचा सर्वात महत्वाचा सण मानला जातो. या नऊ रात्रींमध्ये दुर्गा देवीच्या नऊ स्वरूपांची पूजा केली जाते. प्रत्येक दिवसाला एक वेगळे रूप आणि त्यामागे दडलेले तत्त्वज्ञान असते. दुर्गेची उपासना केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात, आत्मविश्वास वाढतो आणि मनाला शांती मिळते. भक्तीभावाने केलेल्या पूजेमुळे दैवी शक्तीचे संरक्षण लाभते. नवरात्रीत उपवास, जप, कीर्तन, आरती आणि भजन यांचा विशेष महत्त्व असतो. देवीची कृपा लाभल्याने ज्ञान, संपत्ती, आरोग्य आणि सुख प्राप्त होते.
देवी दुर्गेची 108 नावे
सती
साध्वी
भवप्रीता
भवानी
भवमोचनी
आर्या
दुर्गा
जया
आद्या
त्रिनेत्रा
शूलधारिणी
पिनाकधारिणी
चित्रा
चंद्रघंटा
महातपा
मन
बुद्धि
अहंकारा
चित्तरूपा
चिता
चिति
सर्वमंत्रमयी
सत्ता
सत्यानंदस्वरुपिणी
अनंता
भाविनी
भव्या
अभव्या
सदागति
शाम्भवी
देवमाता
चिंता
रत्नप्रिया
सर्वविद्या
दक्षकन्या
दक्षयज्ञविनाशिनी
अपर्णा
अनेकवर्णा
पाटला
पाटलावती
पट्टाम्बरपरिधाना
कलमंजरीरंजिनी
अमेयविक्रमा
क्रूरा
सुंदरी
सुरसुंदरी
वनदुर्गा
मातंगी
मतंगमुनिपूजिता
ब्राह्मी
माहेश्वरी
ऐंद्री
कौमारी
वैष्णवी
चामुंडा
वाराही
लक्ष्मी
पुरुषाकृति
विमला
उत्कर्षिनी
ज्ञाना
क्रिया
नित्या
बुद्धिदा
बहुला
बहुलप्रिया
सर्ववाहनवाहना
निशुंभशुंभहननी
महिषासुरमर्दिनी
मधुकैटभहंत्री
चंडमुंडविनाशिनी
सर्वसुरविनाशा
सर्वदानवघातिनी
सर्वशास्त्रमयी
सत्या
सर्वास्त्रधारिणी
अनेकशस्त्रहस्ता
अनेकास्त्रधारिणी
कुमारी
एककन्या
कैशोरी
युवती
यति
अप्रौढ़ा
प्रौढ़ा
वृद्धमाता
बलप्रदा
महोदरी
मुक्तकेशी
घोररूपा
महाबला
अग्निज्वाला
रौद्रमुखी
कालरात्रि
तपस्विनी
नारायणी
भद्रकाली
विष्णुमाय
जलोदरी
शिवदुती
कराली
अनंता
परमेश्वरी
कात्यायनी
सावित्री
प्रत्यक्षा
ब्रह्मावादिनी
जप कसा करावा?
नवरात्रीच्या काळात सकाळी स्नान करा, स्वच्छ कपडे घाला आणि देवीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर दिवा लावा. नंतर पूर्ण भक्तीनं दुर्गा अष्टोत्तर शतनामावलीचा पाठ करा. नावांचे पठण मनातल्या मनात किंवा मोठ्याने करू शकता.
टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.