Vastu Tips to bring money into the house: लोक पैसे मिळवण्याचे विविध मार्ग शोधत असतात. अनेकदा पैसे मिळूनसुद्धा घरात पैसे टिकत नाहीत. अशावेळी यामध्ये काही वास्तु दोषसुद्धा असू शकतात. हिंदू धर्मानुसार घरात वास्तु दोष असल्यास नकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळेच घरात आर्थिक नुकसान होते आणि पैसाही टिकत नाही.
वास्तु शास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि घरात आर्थिक समृद्धी येण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास घरात सकारात्मकता येते. आणि घरात आर्थिक समृद्धी आणि धनधान्य येते. तुमच्याही घरात पैसे टिकत नसतील किंवा सतत आर्थिक अडचणी येत असतील तर काय वास्तु उपाय करायचे ते जाणून घेऊया….
अंथरुणात जेवू नये-
वास्तु शास्त्रानुसार अंथरुणात कधीही जेवू नये. असे केल्याने घरात दारिद्रय येते. घरात आर्थिक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे कधीही अंथरुणात बसून जेवू नये.
वाणी-
वास्तु शास्त्रानुसार ज्या घरात लोकांची वाणी इतरांसोबत वाईट आहे, त्या घरात कधीच माता लक्ष्मी वास नाही करत. त्यामुळे अशा घरात पैसा टिकत नाही. त्यामुळे नेहमीच इतरांसोबत चांगले आणि मधुर बोला.
पैसे मिळवण्यासाठी वास्तु उपाय-
वास्तु शास्त्रानुसार घरात पैशांची आवक वाढवण्यासाठी किंवा आर्थिक समृद्धी येण्यासाठी दात नेहमी स्वच्छ ठेवावे. मौखिक स्वच्छता आणि स्वच्छ दात असणाऱ्यांजवळ नेहमीच आर्थिक समृद्धी राहते. घरात पैशांची अडचण येत असेल किंवा सतत पैसे खर्च होत असतील तर त्यासाठी ही गोष्ट करणे सर्वात महत्वाची आहे.
स्वच्छ कपडे परिधान करा-
वास्तु शास्त्रानुसार धनाची देवी लक्ष्मी नेहमी स्वच्छ ठिकाणीच वास करते. त्यामुळे नेहमीच स्वच्छ कपडे परिधान करा स्वच्छ कपडे परिधान केल्यास धन आकर्षित होते. आणि घरातील आर्थिक अडचणी दूर होतात.
सूर्योदयानंतर झोपू नये-
वास्तु शास्त्रानुसार दिवस उजाडल्यानंतर कष्ट करायला लागले पाहिजे. सूर्योदयानंतर झोपल्यास माता लक्ष्मी नाराज होते. त्यामुळे तुमच्या घरात धनधान्य आणि पैशांची कमतरता होते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






