दिवाळीपूर्वी साजरा होणारा सण म्हणजे धनत्रयोदशी (Dhantrayodashi 2025) …. यंदा 18 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाईल. हा दिवस भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्या पूजेसाठी समर्पित असतो. शास्त्रांनुसार, या दिवशी काही नियमांचे पालन केल्याने घरात सुख आणि समृद्धी येते. परंतु या दिवशी काही गोष्टी टाळणेही तितकेच गरजेचे आहे. धनत्रयोदशी च्या दिवशी एखाद्याला काही वस्तू उधार देणे किंवा दान करणे अशुभ मानले जाते. शास्त्र आणि परंपरेनुसार धनत्रयोदशीला कोणाला उसने किंवा उधार काही दिल्यास देवी लक्ष्मीला राग येतो आणि तुम्ही गरीब होऊ शकता. आयुष्यभर कंगाल होऊ शकता. त्यामुळे कितीही जवळचा कोणी असला तरी खालील वस्तू धनत्रयोदशी च्या दिवशी कोणालाही देऊ नका.
उधार पैसे देणे
धनत्रयोदशीला देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. म्हणून, या दिवशी कोणालाही पैसे देणे अशुभ मानले जाते. असे केल्याने देवी लक्ष्मीला राग येतो आणि हळूहळू संपत्ती कमी होते असे मानले जाते. म्हणून, पैसे मागणारी व्यक्ती कितीही जवळची असली तरी, या दिवशी पैसे उधार देऊ नका, अन्यथा तुमच्याकडचा पैसा हळूहळू तुमच्यापासून दूर जाईल.
साखर उधार देणे (Dhantrayodashi 2025)
साखर हि आपल्या प्रत्येकाच्या घरात असतेच.. आणि कोणी शेजाऱ्याने आपल्याला साखर उधार मागितली तरी आपण आनंदाने देत असतो. परंतु धनत्रयोदशीच्या संध्याकाळी चुकूनही कोणाला साखर उधार देऊ नका. साखर आणि ऊस देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहेत. खरं तर, देवी लक्ष्मीला नैवेद्य म्हणून ऊस आवडतो आणि साखर त्याचाच एक भाग आहे. अशावेळी जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी एखाद्याला साखर उधार दिली तर असे मानले जाते की तुम्ही देवी लक्ष्मीला तुमच्या घरातून बाहेर केल्या सारखं आहे. म्हणून, या दिवशी कोणाला साखर देऊ नका किंवा कोणाकडेही मागू नका.
मीठ देणे
मीठ ही दैनंदिन जीवनात सामान्यतः उधार दिल्या जाणाऱ्या वस्तूंपैकी एक आहे, परंतु धनत्रयोदशीच्या संध्याकाळी मीठ उधार देणे ही एक मोठी चूक ठरू शकते. मीठ समुद्राशी संबंधित आहे आणि देवी लक्ष्मीचा जन्म देखील समुद्रमंथनातून झाला होता. म्हणून, मीठ लक्ष्मीशी संबंधित आहे. अशावेळी धनत्रयोदशीच्या दिवशी एखाद्याला मीठ उधार दिल्याने घरात आर्थिक समस्या निर्माण होऊ लागतात.
याशिवाय धनत्रयोदशीच्या दिवशी (Dhantrayodashi 2025) दूध, दही, तेल किंवा यासारख्या वस्तू देऊ नका किंवा मागूही नका. या सर्व वस्तू घराच्या उर्जेवर आणि ग्रहांच्या स्थितीवर परिणाम करतात. त्या उधार दिल्याने तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा निघून जाते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






