BhauBeej 2025 : भाऊबीजच्या दिवशी बनवा चविष्ट अंजीर हलवा पाहा रेसिपी…

Published:
BhauBeej 2025 : भाऊबीजच्या दिवशी बनवा चविष्ट अंजीर हलवा पाहा रेसिपी…

भावाच्या बहिणीच्या नात्यातील प्रेमळ सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीला छान छान गिफ्ट देतात. या दिवशी बहीण भावाला छान छान पदार्थ बनवून खाऊ घालते. यंदाच्या भाऊबीजला तुम्हीसुद्धा तुमच्या लाडक्या भावाला छान गोड पदार्थ बनवून द्या. भाऊबीजच्या दिवशी तुम्ही लाडक्या भावासाठी अंजीर हलवा बनवू शकता. आज आपण अंजीर हलवा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत…

साहित्य

  • सुके अंजीर(गरम पाण्यात भिजवून ठेवा)
  • बदाम आणि काजू (बारीक चिरलेले)
  • खजूर (बी काढून)
  • वेलची पावडर
  • केशर
  • दूध
  • तूप

कृती

  • सर्वप्रथम सुके अंजीर आणि खजूर 15-20 मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा.
  • एका मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले अंजीर आणि खजूर थोडे दूध घालून बारीक पेस्ट करून घ्या.
  • कढईत 1 चमचा तूप गरम करून ड्रायफ्रूट्स थोडेसे खरपूस भाजून घ्या.
  • त्याच कढईत तूप गरम करा आणि त्यात अंजीर आणि खजूरची पेस्ट घालून परतून घ्या.
  • आता त्यात दूध आणि केशर घाला आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.
  • मिश्रण छान हलव्यासारखं एकजीव करा. तूप सुटायला लागलं आणि कढईला चिकटणं थांबलं की समजावं की हलवा तयार आहे.
  • आता त्यात वेलची पावडर आणि चिरलेले ड्रायफ्रुट्स (बदाम आणि काजू) घालून चांगले मिसळा.
  • अंजीर हलवा 1 ते 2 मिनिटे शिजवा आणि नंतर सर्व्ह करा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews