दिवाळी सण म्हणजे आनंद, उत्साहाचा, जल्लोषाचा. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेचजण दिवाळी उत्साहात साजरी करतात. दिवाळी या सणानिमित्त फटाके फोडणे, नातेवाईक आणि शेजाऱ्यांसोबत मजा करणे, विविध मिठाई आणि पदार्थांचा आस्वाद घेणे, गोड धोड खाणे हे सुरुच असते. दिवाळीच्या सणानिमित्त आपण आपल्या प्रिजनांच्या भेटीगाठी घेतो. यंदाच्या दिवाळीत घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी तुम्ही दुधीची खीर बनवू शकता. आज आपण दुधीची खीर कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत…
साहित्य
- १ कप किसलेला दुधी भोपळा
- १ लिटर दूध
- १/२ कप साखर (आवडीनुसार)
- १/४ चमचा वेलची पूड
- बदाम, पिस्ता, काजू इत्यादी ड्राय फ्रुट्स
- तूप (ऐच्छिक)
कृती
- दुधी भोपळा सोलून किसून घ्या. किसलेला दुधी हातांनी दाबून त्यातील सर्व पाणी पिळून काढून टाका. यामुळे खीर घट्ट होणार नाही.
- एका कढईमध्ये दूध गरम करा आणि उकळी आणा. त्यात पिळून काढलेला दुधी घाला आणि मंद आचेवर दूध अर्धे होईपर्यंत शिजवा. दुधी पूर्णपणे शिजला पाहिजे.
- दुधी शिजल्यावर त्यात साखर घाला आणि साखर विरघळेपर्यंत ढवळत राहा.
- वेलची पूड आणि तुमच्या आवडीचे ड्राय फ्रुट्स (बदाम, पिस्ता, काजू इत्यादी) घालून मिक्स करा.
- खीर तयार झाल्यावर एका बाऊलमध्ये काढून घ्या. वरून अजून थोडे ड्राय फ्रुट्स घालून सजवा आणि गरमागरम किंवा थंडगार सर्व्ह करा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





