Marathi News

BhauBeej 2025 : भाऊबीजनिमित्त घरच्या घरी बनवा टेस्टी खव्याची बर्फी, वाचा रेसिपी…

Published:
BhauBeej 2025 : भाऊबीजनिमित्त घरच्या घरी बनवा टेस्टी खव्याची बर्फी, वाचा रेसिपी…

भावाच्या बहिणीच्या नात्यातील प्रेमळ सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीला छान छान गिफ्ट देतात. या दिवशी बहीण भावाला छान छान पदार्थ बनवून खाऊ घालते. यंदाच्या भाऊबीजला तुम्हीसुद्धा तुमच्या लाडक्या भावाला छान छान गोड पदार्थ बनवून द्या. आज आम्ही तुम्हाला खव्याच्या बर्फी कशी बनवायची ह्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत…

साहित्य

  • २५० ग्रॅम खवा
  • १ कप साखर
  • १/४ कप दूध
  • आवडीनुसार सुका मेवा (बदाम, पिस्ता)

कृती

  • एका भांड्यात खवा घेऊन मंद आचेवर गरम करा.
  • खवा पूर्णपणे विरघळल्यावर त्यात साखर आणि दूध घाला.
  • मिश्रण घट्ट होईपर्यंत आणि भांड्याच्या कडा सोडेपर्यंत शिजवा.
  • या मिश्रणात आवडीनुसार सुका मेवा घालून मिक्स करा.
  • एका ताटाला तूप लावून त्यावर हे मिश्रण एकसारखे पसरा.
  • थंड झाल्यावर त्याच्या बर्फीच्या वड्या पाडा.
  • ही बर्फी भाऊबीजेला तुमच्या भावासाठी एक उत्तम भेट ठरू शकते. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews