भावाच्या बहिणीच्या नात्यातील प्रेमळ सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीला छान छान गिफ्ट देतात. या दिवशी बहीण भावाला छान छान पदार्थ बनवून खाऊ घालते. यंदाच्या भाऊबीजला तुम्हीसुद्धा तुमच्या लाडक्या भावाला छान गोड पदार्थ बनवून द्या. भाऊबीजच्या दिवशी तुम्ही लाडक्या भावासाठी आंबा शेवया बनवू शकता. आज आपण केशर आंबा शेवया कश्या बनवायच्या याची रेसिपी पाहणार आहोत…

साहित्य

  • शेवया (सेवई)
  • दूध
  • साखर
  • आंबा (बारीक कापलेले)
  • वेलची पूड
  • सुका मेवा (काजू, बदाम, मनुका)

कृती

  • शेवयांना थोडं तूप लावून सोनेरी रंगावर भाजून घ्या.
  • एक लिटर दूध गरम करून त्यात साखर आणि वेलची पूड घाला.
  • दुध आटल्यावर गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या.
  • एक थंडगार वाटी घ्या. त्यात भाजलेल्या शेवया आणि कापलेले आंब्याचे तुकडे घाला.
  • त्यावर तयार केलेले दुधाचे मिश्रण घाला आणि सुका मेवा घालून सर्व्ह करा.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)