Marathi News

BhauBeej 2025 : भाऊबीजच्या दिवशी लाडक्या भावासाठी बनवा चविष्ट केशर श्रीखंड पुरी पाहा रेसिपी…

Published:
यंदाच्या भाऊबीजला तुम्हीसुद्धा तुमच्या लाडक्या भावाला छान गोड पदार्थ बनवून द्या. भाऊबीजच्या दिवशी तुम्ही लाडक्या भावासाठी केशर श्रीखंड पुरी बनवू शकता.
BhauBeej 2025 : भाऊबीजच्या दिवशी लाडक्या भावासाठी बनवा चविष्ट केशर श्रीखंड पुरी पाहा रेसिपी…

भावाच्या बहिणीच्या नात्यातील प्रेमळ सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीला छान छान गिफ्ट देतात. या दिवशी बहीण भावाला छान छान पदार्थ बनवून खाऊ घालते. यंदाच्या भाऊबीजला तुम्हीसुद्धा तुमच्या लाडक्या भावाला छान गोड पदार्थ बनवून द्या. भाऊबीजच्या दिवशी तुम्ही लाडक्या भावासाठी केशर श्रीखंड पुरी बनवू शकता. आज आपण केशर श्रीखंड पुरी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत…

साहित्य श्रीखंडासाठी

  • १ किलो घट्ट दही (चक्का तयार करण्यासाठी)
  • साखर (चवीनुसार)
  • वेलची पूड
  • केशर
  • बदाम, काजू, पिस्ता (ऐच्छिक)

पुरीसाठी साहित्य

गव्हाचे पीठ
तेल (तळण्यासाठी)
मीठ (चवीनुसार).

श्रीखंड बनवण्याची कृती

  • चक्का तयार करणे
    एका कॉटनच्या कापडात दही बांधून ५-६ तास टांगून ठेवा. दहीतील पाणी निघून गेल्यावर ‘चक्का’ तयार होईल.
  • साखर घालणे
    चक्क्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेली साखर घालून चांगले मिसळा.
  • केशर आणि वेलची घालणे
    या मिश्रणात केशर आणि वेलची पावडर घालून छान परतून घ्या.
  • सुकामेवा घालणे
    शेवटी चिरलेला सुकामेवा घालून चांगले मिसळून घ्या.
  • थंड करणे

    तयार झालेले श्रीखंड फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. 

पुरी बनवण्याची कृती

  • पीठ मळणे
    गव्हाच्या पिठात थोडे तेल आणि मीठ घालून मळून घ्या.
  • पुरी लाटणे
    पिठाचे छोटे गोळे करून पातळ पुरी लाटा.
  • तळणे

    गरम तेलात पुरी सोनेरी रंगावर तळून घ्या. 

टीप: तुम्ही तुमच्या आवडीनुसार श्रीखंडामध्ये पिस्ता, बदाम किंवा इतर सुकामेवा घालू शकता.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews