Diwali 2025 : दिवाळीत ‘या’ शुभ वस्तू खरेदी करा…

Published:
दिवाळी हा सण कार्तिक महिन्यातील अमावस्येच्या दिवशी साजरी केली जाते. तर यंदा दिवाळी सणाच्या आधी तुम्ही तुमच्या घरात काही शुभ वस्तू आणू शकता. चला त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊयात....
Diwali 2025 : दिवाळीत ‘या’ शुभ वस्तू खरेदी करा…

हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्व आहे. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी दिवाळी साजरी केली जाते. यावर्षी दिवाळी कार्तिक अमावास्येच्या दिवशी, म्हणजेच 20 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. दिवाळीत सर्वत्र मंगलमय वातावरण दिसतं. तसेच सर्वत्र फक्त दिव्यांचा प्रकाश दिसतो. या दिवसांमध्ये लक्ष्मी मातेची आणि भगवान गणेशाची पूजा केली जाते.

दिवाळी सणात खरेदीला विशेष महत्त्व असते

दिवाळीत खरेदीला विशेष महत्त्व आहे. कारण ती लक्ष्मी आणि समृद्धीच्या देवीचे स्वागत करण्याची आणि नवीन सुरुवात करण्याची वेळ मानली जाते. या काळात नवीन कपडे, सोने, वाहन किंवा घर खरेदी करण्यावर लोकांचा भर असतो आणि अनेकजण शुभ वस्तू खरेदी करतात. दिवाळी हा धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करण्याचा सण आहे. या काळात खरेदी करणे हे देवी लक्ष्मीला घरात आमंत्रित करण्याचे एक प्रतीक मानले जाते. 

लक्ष्मी-गणेश मूर्ती

दिवाळीत लक्ष्मी आणि गणेशाच्या मूर्ती घरात ठेवल्याने देवी-देवतांची कृपा राहते आणि घरात सुख-समृद्धी वाढते असे मानले जाते. गणेशाला विघ्नहर्ता म्हणतात आणि लक्ष्मीला धन-धान्याची देवी मानले जाते, त्यामुळे या दोघांची एकत्र पूजा केल्याने सर्व अडचणी दूर होतात आणि घरात आर्थिक स्थैर्य व भरभराट येते.

तुळशीचे रोप 

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष महत्त्व आहे. दिवाळीमध्ये तुळशीचे रोप खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते, म्हणून, दिवाळीच्या आधी तुम्ही तुमच्या घरात हे रोप लावू शकता . हे रोप लावल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वाद सदैव मिळत राहतो. तुळशीचे रोप सकारात्मकता, आशीर्वाद आणि समृद्धी आणते. हे एक पवित्र आणि शुभ झाड आहे जे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि हवा शुद्ध ठेवते. 

धातूचा कासव

दिवाळीत धातूचा कासव खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण ते घरात धन आणि समृद्धी आणते. वास्तुशास्त्रानुसार, कासवाचे तोंड घराच्या आतल्या बाजूला किंवा देवघराच्या दिशेने ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा येते. या दिशेने पितळ, सोने किंवा चांदीपासून बनवलेली कासव मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. हिंदू धर्मात धातूचा कासव शुभ मानला जातो. सागरमंथनाच्या वेळी भगवान विष्णूंनी कासवाचे रूप धारण केले होते, असे मानले जाते. दिवाळीच्या मुहूर्तावर धातूचा कासव घरी आणल्यास आर्थिक आवक वाढते.

दिवा आणि पणत्या

दिवाळीत दिवा किंवा पणत्या लावणे अनिवार्य आहे. याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होते.

दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव असल्यामुळे घरात दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा घरात वाढते. धार्मिक मान्यता आहे की दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरातील सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

नारळ

दिवाळीच्या दिवशी घरात नारळ आणणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे आर्थिक तंगी दूर होते आणि तिजोरी कधीही रिकामी राहत नाही. नारळ घरात आणणे हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. दिवाळीत घरात समृद्धी आणण्यासाठी नारळ, रांगोळी आणि पारंपरिक मिठाई यांसारख्या शुभ वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. नारळ घरात आणल्याने आर्थिक भरभराट होते आणि तिजोरी कधीही रिकामी राहत नाही. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात समृद्धी नांदते. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews