प्रत्येक सणाची काही स्पेशल रेसिपी असते. त्यात दिवाळी हा महत्वाचा सण आहे. कारण, या सणामध्ये अनेक रेसिपी असतात. लाडू, चिवडा, करंजी, चकली, शंकरपाळी, कापण्या, शेव, अनारसे, बाकरवडी मुगाच्या डाळीचे लाडू अशा अनेक रेसिपींची मेजवाणीच असते. यंदाच्या दिवाळीच्या फराळाची तयारी घरोघरी सुरु झाली असेल. दिवाळीचा फराळामध्ये बेसनचा लाडू हा हमखास ठरलेला असतो. चला तर मग जाणून घेऊ या बेसनच्या लाडूची रेसिपी….
साहित्य
- १ कप बेसन
- १/४ कप तूप
- ३/४ कप पिठीसाखर (तुम्ही चवीनुसार कमी-जास्त करू शकता)
- १ चमचा वेलची पूड
- बदाम, काजू किंवा पिस्त्याचे काप
कृती
- एका कढईत तूप गरम करा.
- तूप गरम झाल्यावर त्यात बेसन घालून मंद आचेवर मिश्रण सतत हलवत राहा.
- बेसन खमंग भाजले जाईपर्यंत आणि त्याचा सुगंध येईपर्यंत भाजा. बेसनचा रंग थोडा बदलतो आणि त्याचे कण मोकळे होतात.
- भाजलेले मिश्रण एका ताटात काढून पूर्णपणे थंड होऊ द्या.
- मिश्रण थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर आणि वेलची पूड घालून चांगले मिक्स करा.
- या मिश्रणात तुम्ही बदाम, काजू किंवा पिस्त्याचे काप देखील घालू शकता.
- आता तयार मिश्रणाचे छोटे छोटे लाडू वळा.
- हे लाडू हवाबंद डब्यात भरून ठेवा, जेणेकरून ते ताजे राहतील.






