Diwali 2025 : लाडक्या भावाला भाऊबीजनिमित्त द्या ‘या’ खास भेटवस्तू

Published:
भाऊबीजेला भावाला गिफ्ट द्यायचा विचार करताय? तर या बेस्ट गिफ्ट आयडियाज तुम्हाला मदत करू शकतात.
Diwali 2025 : लाडक्या भावाला भाऊबीजनिमित्त द्या ‘या’ खास भेटवस्तू

भाऊबीज हा बहीण आणि भावाच्या अतूट नात्याचा सण आहे. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्ष द्वितिया तिथिला ‘भाऊबीज’ सण साजरा केला जातो. यंदा २३ ऑक्टोबर रोजी भाऊबीज साजरी केली जाईल. दिवाळीच्यावेळी भाऊबीजेला सर्वाधिक भेटवस्तू दिल्या जातात, या भाऊबीजेला भावासाठी काय भेटवस्तू खरेदी करावी, हा प्रश्न बहिणींना पडत असतो. भाऊबीजेला भावाला गिफ्ट द्यायचा विचार करताय? तर या बेस्ट गिफ्ट आयडियाज तुम्हाला मदत करू शकतात….

स्मार्टवॉच

भाऊबीजेदिवशी तुमच्या भावाच्या फिटनेसाठी एक चांगलं स्मार्टवॉच भेट देऊ शकता. भाऊबीजेला भावाला स्मार्टवॉच भेट देणे हा एक चांगला पर्याय आहे, कारण ते आरोग्याची काळजी घेण्यास मदत करते आणि आधुनिक काळातील उपयुक्त गॅझेट आहे.

पॉवर बँक

भाऊबीजेला भावाला गिफ्ट देण्यासाठी पॉवर बँक एक चांगला पर्याय आहे, कारण ती रोजच्या वापरात खूप उपयुक्त ठरते. अलिकडे फोनची बॅटरी लवकर संपते. यासाठी भाऊबीजेदिवशी भावाला पॉवर बँक भेट देणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

इअरबड्स

इअरबड्सचा ट्रेंड खूप वेगाने वाढत आहे. या भाऊबीजेला भावाला तुम्ही नवीन इअरबड्स भेट देऊ शकता.

ट्रिमर

या भाऊबीजेदिवशी बहिणी भावाला ट्रिमर भेट देऊ शकतात. रोजच्या वापरासाठी उपयोगी, हे एक चांगले गिफ्ट आहे.

ग्रूमिंग किट

पुरूषांनी रूबाबदार दिसावं यासाठी बाजारात अनेक ग्रूमिक किट उपलब्ध असतात. मुलं स्वतःकडे विशेष लक्ष देत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचं एखादं गिफ्ट त्यांना दिलं तर ते त्यांना नक्कीच आवडतं.

जिम बॅग

भाऊबीजेला भावाला गिफ्ट देण्यासाठी जिम बॅग हा एक चांगला पर्याय आहे, खासकरून जर त्याला व्यायामाची आवड असेल. या व्यतिरिक्त, तुम्ही त्याच्या आवडीनुसार इतर अनेक भेटवस्तू निवडू शकता. उत्तम आरोग्यासाठी नियमित जीमला जाण्याची गरज असते. जर तुमचा भावाला जीमला जाण्याची आवड असेल तर त्याला तुम्ही जीम वेअर गिफ्ट देऊ शकता. शिवाय अशा प्रकारची एखादी जीम बॅगदेखील तुम्ही त्याला गिफ्ट देऊ शकता.

सनग्लासेस

भाऊबीजेला भावाला सनग्लासेस गिफ्ट म्हणून देणे एक उत्तम पर्याय आहे, कारण ते स्टायलिश, उपयुक्त आणि कोणत्याही प्रसंगासाठी चांगली भेट आहे. तुमच्या भावाच्या चेहऱ्याच्या आकाराला आणि आवडीला साजेशे, तसेच त्याच्या व्यक्तिमत्त्वाला जुळतील असे सनग्लासेस निवडा. सनग्लासेस अथवा गॉगल नेहमीच फॅशन म्हणून वापरता येतात. त्यामुळे जर तुमचं भाऊ थोडा ट्रेन्डी असेल तर त्याला सनग्लासेस गिफ्ट द्या.

शर्ट आणि टी-शर्ट

यंदाच्या भाऊबीजेला तुम्ही तुमच्या भावाला छान शर्ट किंवा टी-शर्ट खरेदी करुन भेट देऊ शकता. स्वस्तात मस्त शर्ट किंवा टी-शर्ट बाजारात उपलब्ध आहेत.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews