Marathi News

यंदा दिवाळीत करा सर्वात वेगळा फराळ, ऋग्वेद काळापासून केला जाणारा ‘अपूप’ हा पदार्थ नक्की ट्राय करा..

Published:
'अपूप' या शब्दाचा एक अर्थ 'जो कुजत नाही' असा आहे, जो त्याच्या टिकाऊपणाला सूचित करतो.
यंदा दिवाळीत करा सर्वात वेगळा फराळ, ऋग्वेद काळापासून केला जाणारा ‘अपूप’ हा पदार्थ नक्की ट्राय करा..

लवकरच दिवाळी येतेय.. त्या निमित्ताने अनेक घरात साफसफाईला सुरूवात झालीय. तर काही ठिकाणी दिवाळीचा फराळ आणि मिठाई बनवायचाही तयारी झालीय. दिवाळीचा सण जसजसा जवळ येतो तसतसा आपल्याला मिठाईचा सुगंध आणि गोडवा जाणवू लागतो. अपूप हा ऋग्वेद काळात बनवला जाणारा एक गोड पदार्थ आहे, जो तांदूळ आणि गव्हाच्या पिठात तूप किंवा दही घालून साजूक तुपात तळलेला एक प्रकारचा वडा आहे. या पदार्थाचा उल्लेख ‘यागू, पूप व भत्त’ या प्राचीन तांदळाच्या तीन प्रकारच्या पदार्थांमध्ये ‘पूप’ या नावाने आढळतो, जिथे ‘पूप’ म्हणजे वडा. अपूप’ म्हणजे असा पदार्थ जो ‘पुयते’ म्हणजेच कुजत नाही किंवा खराब होत नाही, असे म्हटले जाते.

साहित्य

  • तांदळाचे पीठ
  • तूप
  • दही
  • साजूक तूप (तळण्यासाठी)
  • पिठीसाखर

कृती

  • तांदळाच्या पिठात दही घालून पीठ चांगले मळून घ्यावे.
  • गरज असल्यास किंचित पाणी घालावे.
  • तयार पिठापासून छोट्या, जाडसर पुर्‍या लाटाव्यात व गरम तुपात तळाव्यात.
  • तळलेले अपूप पिठीसाखरेत घोळवून गरम गरम खावेत.

टीप

  • आपण आपल्या आवडीनुसार या मिश्रणात तूप किंवा दही वापरू शकता.
  • अपूप हे तांदूळ आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेले एक गोड पक्वान्न आहे.
  • याचा उल्लेख ऋग्वेदात ‘पूप’ या नावाने आढळतो.
  • अपूपची आधुनिक आवृत्ती म्हणजे ‘मालपुवा’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhojan.Kutuhalam (@bhojan.kutuhalam)

 

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews