अवघ्या काही दिवसात दिवाळी येणार असल्याने सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे, कोणाच्या घरी साफसफाई, कोणाच्या घरी फराळाची तयारी, कोणाकडे सजावटीची तयारी… दिवाळी हा सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पाच दिवस चालणारा उत्सव धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि भाऊबीजच्या दिवशी संपतो. यावेळी बाजारातून मिठाई आणण्याऐवजी घरीच काही साध्या सोप्या रेसिपी ट्राय करू शकता.

साहित्य

  • 1 कप खवा (मावा)
  • 1/4 कप मैदा
  • 1/4 टीस्पून बेकिंग पावडर
  • 1 कप साखर
  • 1 कप पाणी
  • 1/4 टीस्पून वेलची पावडर
  • तळण्यासाठी तेल

कृती

  • सर्व प्रथम एका वाडग्यात खवा, मैदा आणि बेकिंग पावडर एकत्र करून मऊ पीठ मळून घ्या.
  • नंतर त्याचे छोटे छोटे गोळे (साधारण 1 इंच) करा.
  • आता एका पॅनमध्ये साखर आणि पाणी एकत्र करा आणि साखर विरघळेपर्यंत उकळवा. त्याचा पाक तयार करा. वेलची पूड घालून बाजूला ठेवा.
  • एका खोलगट कढईत तेल गरम करून मंद आचेवर गोळे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळा.
  • तळून झाल्यावर साखरेच्या पाकात किमान 2 तास भिजवून मग सर्व्ह करा.