Diwali 2025 : फराळाची चव वाढवेल ‘लसूण शेव’, ट्राय करा सोपी रेसिपी

Published:
फराळामध्ये लज्जत वाढवण्यासाठी लसूण शेव प्रसिद्ध आहे. या शेवची चटपटीत आणि थोडीशी तिखट चव फारच छान लागते.
Diwali 2025 : फराळाची चव वाढवेल ‘लसूण शेव’, ट्राय करा सोपी रेसिपी

दिवाळी तोंडावर आली आहे आणि अनेकांच्या घरात साफसफाई करून फराळ बनवायलाही सुरूवात झाली आहे. अशात जर तुम्हाला आणखी काही चटपटीत करायचं असेल, तर आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहे. फराळामध्ये लज्जत वाढवण्यासाठी लसूण शेव प्रसिद्ध आहे. या शेवची चटपटीत आणि थोडीशी तिखट चव फारच छान लागते. चला तर मग पाहूया लसुण शेव बनवण्याची सोपी रेसिपी…

साहित्य

  • बेसन: २ कप
  • लसूण पेस्ट: गरजेनुसार
  • मीठ: चवीनुसार
  • हळद: चवीनुसार
  • तिखट: चवीनुसार
  • जिरे: चवीनुसार
  • ओवा: चवीनुसार
  • पाणी: आवश्यकतेनुसार
  • तेल: तळण्यासाठी 

कृती

  • एका मोठ्या भांड्यात बेसन घ्या आणि त्यात मीठ, हळद, तिखट, जिरे आणि ओवा घाला.
  • लसूण पेस्ट घालून सर्व साहित्य चांगले एकत्र करा.
  • थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठ जास्त पातळे किंवा घट्ट नसावे.
  • पीठ मळल्यानंतर शेव मशीनमध्ये पिठाचा गोळा भरा.
  • कढईत तेल गरम करा.
  • गरम तेलात शेव मशीनच्या मदतीने शेव पाडा आणि मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
  • तळलेली शेव एका जाळीवर काढून घ्या जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल.
  • शेव थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा.