Diwali 2025 : दिवाळी स्पेशल खुसखुशीत नानकटाई; दिवाळीच्या फराळातली खास रेसिपी…

Published:
नानकटाई बनवताना सर्वात महत्त्वाचे असते प्रमाण. साहित्य घेताना तुम्ही ते किती प्रमाणात घेतले पाहिजे याचेच परफेक्ट माप आणि रेसिपी आज तुम्हाला सांगणार आहोत.
Diwali 2025 :  दिवाळी स्पेशल खुसखुशीत नानकटाई; दिवाळीच्या फराळातली खास रेसिपी…

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येत आहे. हा दिव्यांचा उत्सव दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो.  हा वर्षातील सर्वात आनंदाचा काळ आहे, जो लोक मोठ्या थाटामाटात साजरा करतात. सणासुदीच्या काळात मिठाई नसेल असं एकही घर नाही. प्रत्येक आनंदाच्या प्रसंगी मिठाई नक्कीच दिली जाते. आज आम्ही तुम्हाला घरी सोप्या पद्धतीने आणि खुसखुशीत नानकटाई कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य

  • २ वाटी मैदा
  • १.५ वाटी तूप किंवा बटर (बटर वापरत असल्यास, तूप आणि बटरचे मिश्रण वापरू शकता)
  • १ वाटी पिठीसाखर
  • १ चमचा बेकिंग सोडा
  • १/४ चमचा वेलची पूड (ऐच्छिक)

कृती

  • एका मोठ्या भांड्यात मैदा, पिठीसाखर आणि बेकिंग सोडा एकत्र करून घ्या.
  • त्यामध्ये तूप/बटर घाला आणि मिश्रण चांगले एकजीव करा.
  • मिश्रण घट्टसर गोळा होईपर्यंत मळून घ्या. जास्त मळू नका.
  • या गोळ्याचे छोटे छोटे भाग करून त्यांना नानकटाईचा आकार द्या.
  • नानकटाई बेकिंग ट्रेवर ठेवा आणि ओव्हनमध्ये 180°C तापमानावर १५-२० मिनिटे बेक करा किंवा सोनेरी रंग येईपर्यंत गरम करा.
  • ओव्हन नसल्यास, एका जाड बुडाच्या कढईत मीठ किंवा वाळू पसरून त्यावर एक स्टँड ठेवा. त्यावर नानकटाई ठेवून झाकण लावून मंद आचेवर शिजवा.
  • थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवून ठेवा.
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews