Diwali 2025 : दिवाळीसाठी घरी तयार करा कुरकुरीत अणि स्वादिष्ट मुरमुरा चिवडा

Published:
हिंदू धर्मात दिवाळी हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. दिवाळीतील सगळ्यात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे फराळ. दिवाळीच्या 15 दिवस आधीच फराळ बनवायला सुरुवात होते.
Diwali 2025 : दिवाळीसाठी घरी तयार करा कुरकुरीत अणि स्वादिष्ट मुरमुरा चिवडा

दिवाळी काही दिवसांवर आली असताना गृहिणींची फराळ बनवण्याची लगबग सुरू होते. अनेक ठिकाणी हल्ली विकतचा फराळ मिळतो मात्र घरच्या फराळासारखी तशी चव बाजारातल्या फराळाला क्वचितच येते. चकली, लाडू बनवणं बऱ्याचजणांना अवघड वाटतं म्हणून अनेकजण फराळाचे हे पदार्थ बाहेरून आणतात पण हलका, फुलका चिवडा करायला सोपा आणि कमीत कमी वेळेत तयार होणारा असल्यामुळे अनेकजण घरीच हा चिवडा बनवतात. दिवाळीसाठी कुरकुरीत कुरमुऱ्यांचा चिवडा कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत ….

साहित्य

कुरमुरे (मुरमुरे)
तेल
मोहरी
जिरे
कढीपत्ता
शेंगदाणे
डाळ्या
सुक्या खोबऱ्याचे काप
हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
लाल तिखट
हळद
हिंग
साखर
मीठ चवीनुसार

कृती

  • एका मोठ्या कढईत कुरमुरे कुरकुरीत होईपर्यंत मध्यम आचेवर भाजा. ते थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवा.
  • त्याच कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी आणि जिरे घाला. ते तडतडल्यावर कढीपत्ता, शेंगदाणे, डाळ्या आणि खोबऱ्याचे काप घालून सोनेरी होईपर्यंत परता. 
  • बारीक चिरलेल्या मिरच्या घालून थोडा वेळ परता.
  • आता त्यात लाल तिखट, हळद, हिंग आणि चवीनुसार मीठ घाला. चिमूटभर साखर घालून चांगले मिसळून घ्या. मसाले करपणार नाहीत याची काळजी घ्या.
  • भाजलेले कुरमुरे या फोडणीत घाला. सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत हळुवारपणे मिसळा. गॅस बंद करा. 
  • चिवडा पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड झाल्यावर तो कुरकुरीत राहील. 
  • थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा. हा चिवडा १५ ते २० दिवस चांगला कुरकुरीत राहतो. 
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews