Diwali 2025 : दिवाळीच्या दिवशी घराच्या तिजोरीत ठेवा या वस्तू; पैशाची कमी कधीच भासणार नाही

Published:
दिवाळीच्या दिवशी (Diwali 2025) तुम्ही तुमच्या तिजोरीत श्रीयंत्र, काउरी शंख, चांदीचे नाणे किंवा लक्ष्मीच्या पावलांचे ठसे ठेवू शकता.
Diwali 2025 : दिवाळीच्या दिवशी घराच्या तिजोरीत ठेवा या वस्तू; पैशाची कमी कधीच भासणार नाही

दिवाळी (Diwali 2025) हा आपला सर्वांचा आवडता सण…. आली माझ्या घरी ही दिवाळी असे आपण आनंदाने म्हणत असतो… दिव्यांच्या रोषणाईचा हा सण तब्बल 5 दिवस चालतो. यंदा 20 ऑक्टोबरला दिवाळी साजरी केली जाणार आहे. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी माता आणि भगवान श्री गणेश यांची मनोभावे पूजा केली जाते. या देवतांची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते तसेच आर्थिक दृष्ट्या तुम्ही मजबूत होता असे म्हटले जाते. परंतु दिवाळीच्या दिवशी काही वास्तु उपाय करणेही तितकेच गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या हातात सतत पैसा खेळता राहील. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर  तुमच्या घराच्या तिजोरीत काही वस्तू ठेवल्याने आर्थिक भरभराट होते.

तिजोरीत ठेवा या वस्तू – Diwali 2025

दिवाळीच्या दिवशी (Diwali 2025) तुम्ही तुमच्या तिजोरीत श्रीयंत्र, काउरी शंख, चांदीचे नाणे किंवा लक्ष्मीच्या पावलांचे ठसे ठेवू शकता. याशिवाय, लक्ष्मीचा आवडता शंख आणि हळदीचा गोळा ठेवल्याने देखील मोठे फायदे मिळू शकतात. या वस्तू तुमच्या तिजोरीत ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि तुमच्या आर्थिक समस्या दूर होतात असे मानले जाते.

घराची तिजोरी कोणत्या दिशेला असावी

वास्तुशास्त्रानुसार घराची तिजोरी ही उत्तर दिशेला असणे शुभ मानले जाते. याचे कारण म्हणजे उत्तर दिशा भगवान कुबेराची दिशा मानली जाते. त्यामुळे उत्तर दिशेला घराची तिजोरी असल्यास आर्थिक चिंता कधीही जाणवत नाही, पैसा नेहमी तुमच्या हातात खेळता राहतो.

अन्य उपाय

दिवाळीला, स्वच्छ लाल कपड्यात गुलाबाच्या पाकळ्या, सुपारी आणि १-२ नाणी बांधा. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी-गणेश पूजेमध्ये हे गठ्ठे ठेवा. पूजा संपल्यानंतर लगेचच, गठ्ठा तुमच्या तिजोरीत ठेवा. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहील आणि तुमच्या घरात संपत्ती आणि समृद्धी येईल.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)