Diwali 2025 Laxmi Mata Mantra : दिवाळीला लक्ष्मी मातेचा हा मंत्र म्हणा; कधीच आर्थिक तंगी होणार नाही

Published:
असे म्हटले जाते की दिवाळीच्या रात्री महालक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मी मातेचा वास करात कायम राहतो.
Diwali 2025 Laxmi Mata Mantra : दिवाळीला लक्ष्मी मातेचा हा मंत्र म्हणा; कधीच आर्थिक तंगी होणार नाही

दिवाळी आपल्या सर्वांच्या आवडता सण… दिव्यांच्या रोषणाईने उजळणारा हा सण सर्वांना हवाहवासा वाटतो. यंदा 20 ऑक्टोबरला दिवाळी साजरी केली जाईल. बघता बघता दिवाळी अगदी तोंडावर आल्याने सर्वत्र दिवाळीच्या तयारीची लगबग पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी माता आणि भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते. धार्मिक ग्रंथांमध्ये, देवी लक्ष्मीला धन, ऐश्वर्य, समृद्धी, कीर्ती आणि वैभवाची देवी मानले जाते. असे म्हटले जाते की दिवाळीच्या रात्री महालक्ष्मी स्तोत्राचे (Diwali 2025 Laxmi Mata Mantra) पठण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मी मातेचा वास करात कायम राहतो.

महालक्ष्मी स्तोत्राचे पठण (Diwali 2025 Laxmi Mata Mantra)

नमस्तेस्तु महामये श्रीपीठे सुरपूजिते.

शंखचक्रगधास्ते महालक्ष्मी नमोस्तु ते.

नमस्ते गरुडारुढे कोलासुरभयंकारी.

सर्व पापांचे रक्षण करणारी देवी महालक्ष्मीला मी नमस्कार करतो.

सर्वज्ञ, सर्वभक्षी देवी सर्वात वाईट आणि भयानक आहे.

सर्व दुःख सहन करणारी देवी महालक्ष्मीला नमस्कार.

सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रयादिनी ।

मंत्राचा उच्चार करताना नेहमी देवी महालक्ष्मीची पूजा करावी.

आद्यंतर्हिते देवी आद्यशक्तीमहेश्वरी ।

योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तु ते ।

सकल सूक्ष्ममहारुद्रे महाशक्तीमहोदरे ।

मी महान देवी महालक्ष्मीला नमन करतो.

पद्मासन स्थितीत देवी परब्रह्मस्वरूपिणी.

परमेशी जगन्मातरमहालक्ष्मी नमोस्तु ते ।

श्वेतांबरधरे देवी नानलंकरभूषिते ।

जगत्स्थिते जगन्मातरमहालक्ष्मी नमोस्तु ते ।

महालक्ष्म्याष्टकं स्तोत्रम् यः पथेद्भक्तिमन्नरः ।

सर्वसिद्धिमवापनोति अवस्थां, प्राप्नोति सदा ।

एकले पथेनित्यं महापापविनाशनम् ।

द्विकालम् यः पथेनित्यं धन्यधान्यसंनविताः ।

त्रिकालम् यः पथेन्नित्यं महाशत्रुविनाशनम् ।

महालक्ष्मीभवेनित्यं प्रसन्न वरदा शुभ ।

महालक्ष्मी स्तोत्राचे फायदे

महालक्ष्मी स्तोत्र, ज्याला महालक्ष्मीष्टक असेही म्हणतात, धन, समृद्धी आणि आनंद प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या लक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने आर्थिक भरभराट होते. पैशाची कमी कधीही पडत नाही. उलट दिवसेंदिवस तुमच्याकडील पैसा हा वाढत जातो. हे स्तोत्र देवी महालक्ष्मीच्या विविध रूपांचे आणि शक्तींचे वर्णन करते. दिवाळीच्या रात्री या स्तोत्राचे पठण केल्याने देवी लक्ष्मी घरात कायमचा निवास करते. (Diwali 2025 Laxmi Mata Mantra)

लक्ष्मीचा आवडता मंत्र

लक्ष्मीचा आवडता मंत्र आहे “ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मीय नमः.” दिवाळीत या मंत्राचा जप केल्याने लक्ष्मीची आशीर्वाद मिळतो. तुमच्या अंगावर कोणती कर्ज असते तर त्या कर्जातून नाही तुम्ही मुक्त होऊ शकता. आणि तुमच्या घराची आर्थिक भरभराट होईल.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)