हिंदू धर्मात दिवाळी (Diwali 2025) हा सण सर्वात मोठा सण म्हणून मानला जातो. धनत्रयोदशीपासून सुरू होणारा हा उत्सव भाऊबीज पर्यंत चालतो. दिवाळी येताच लोक खरेदीला सुरुवात करतात. दिवाळीला नवनवीन कपडे, फटाके खरेदी केले जातात. तसेच घरात नवनवीन वस्तूही घेतल्या जातात. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोन्या-चांदीची खरेदी करणे ही शुभ मानले जाते. परंतु मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का? दिवाळीच्या दिवशी झाडू खरेदी करणे सुद्धा अतिशय शुभ मानले जाते. हा झाडू का विकत घेतला आहे ते जाणून घेऊया..
आपण झाडू का खरेदी करतो? Diwali 2025
धार्मिक श्रद्धेनुसार, झाडू हे संपत्तीचे प्रतीक मानले जाते दिवाळीला झाडू खरेदी केल्याने प्रचंड संपत्ती मिळते, आर्थिक भरभराट होते, धनलाभ होतो असं म्हटलं जातं. दिवाळीला झाडूची खरेदी केल्याने घरात देवी लक्ष्मीचा कायमचा निवास होतो आणि ती कायमचे आशीर्वाद देते. शिवाय, धनतेरसला नवीन झाडू खरेदी करणे देखील शुभ मानले जाते.
झाडू खरेदी करण्याचे महत्त्व
दारिद्र्य दूर करते – झाडू घरातील घाण दूर करतो. घाण ही गरिबी आणि नकारात्मकतेचे प्रतीक मानली जाते. दिवाळीला नवीन झाडू खरेदी करून त्याद्वारे घर स्वच्छ करणे म्हणजे तुम्ही घरातील संपूर्ण वर्षाची गरिबी दूर करत आहात असे मानले जाते.
लक्ष्मीचा निवास – दिवाळीच्या दिवशी ( Diwali 2025) झाडू खरेदी करण्याबाबत आणखी एक समज आहे की असे केल्याने देवी लक्ष्मी घराबाहेर पडत नाही. असे मानले जाते की देवी लक्ष्मी स्वतः स्वच्छ घरात राहते. दिवाळीला झाडू खरेदी केल्याने घरात कायमस्वरूपी संपत्ती आणि समृद्धी मिळते. झाडू खरेदी करण्याची ही परंपरा धनत्रयोदशीला देखील पाळली जाते, कारण या दिवशी केलेल्या खरेदीमध्ये १३ पट वाढ होते.
नियम
झाडू नेहमी लपवून जमिनीवर ठेवावा.
झाडू उभा ठेवणे अशुभ मानले जाते.
झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक असल्याने, कधीही त्यावर पाऊल ठेवू नये किंवा तो ओलांडू नये.
दिवाळीच्या एक दिवस आधी जुना झाडू काढून टाका आणि नवीन वापरा.
जुना झाडू अशा ठिकाणी टाका जिथे त्याला कोणीही स्पर्श करणार नाही.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






