Marathi News

उद्योग-व्यवसायात मनासारखे यश आणि प्रगती हवीय? आजच धारण करा ‘ही’ रत्ने

Published:
रत्न तुम्हाला नोकरी-व्यवसायात प्रगती करण्यास मदत करतात. त्यासाठी तज्ज्ञांच्या सल्य्याने कोणते रत्न धारण करावे हे जाणून घेऊन रत्नांचा वापर करावा.
उद्योग-व्यवसायात मनासारखे यश आणि प्रगती हवीय? आजच धारण करा ‘ही’ रत्ने

 Gemstone for career:    वास्तु शास्त्राप्रमाणेच रत्न शास्त्रालासुद्धा अत्यंत महत्व आहे. रत्नशास्त्रामध्ये विविध रत्नांचा उल्लेख केला जातो. हे रत्न मनुष्याची ग्रह स्थिती संतुलित करण्यास मदत करतात. त्यामुळे अनेक अडचणी दूर होऊन प्रगती होण्यास मदत मिळते. या शास्त्रानुसार विविध रत्न विविध समस्या दूर करण्यात उपयुक्त असतात. त्यामुळे त्या-त्या समस्येनुसार ते-ते रत्न धारण करणे आवश्यक असते. यामध्ये नोकरी आणि व्यवसायात प्रगती आणि नफा मिळवण्यासाठीसुद्धा काही रत्न सुचविण्यात आले आहेत.

बऱ्याचवेळा प्रचंड कष्ट करूनही आपल्या व्यवसायात किंवा नोकरीमध्ये हवे तसे यश मिळत नाही. त्यामुळे अनेकांना निराशा येते. किंवा अनेकांचे व्यवसाय डबघाईला येतात. काहींना नोकरीमधून काढून टाकण्यात येते. अशावेळी रत्न तुम्हाला नोकरी-व्यवसायात प्रगती करण्यास मदत करतात. त्यासाठी तज्ज्ञांच्या सल्य्याने कोणते रत्न धारण करावे हे जाणून घेऊन रत्नांचा वापर करावा. आज आपण अशाच काही रत्नांबाबत जाणून घेऊया….

 

पाचू-

रत्न शास्त्रानुसार करिअरमध्ये प्रगती आणि यश मिळवण्यासाठी पाचू रत्न अत्यंत महत्वाचे आहे. या रत्नामुळे करिअरमधील अडचणी दूर होतात. आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात. तसेच रत्न शास्त्रानुसार, कुंडलीतील बुध ग्रहाची स्थिती मजबूत करण्यासाठी हे रत्न मदत करते. त्यामुळे करिअरमध्ये यश मिळते. शिवाय आर्थिक स्थितीही उत्तम होते. महत्वाची गोष्ट म्हणजे पाचू हे रत्न बुधवारी धारण करणे फायदेशीर असते.

ग्रीन जेड स्टोन-

धन आणि संपत्तीसाठी जेड स्टोन अत्यंत फायदेशीर समजले जाते. रत्न शास्त्रानुसार, हे रत्न परिधान केल्याने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतात. आणि तुमच्या आर्थिक बाबींमध्ये प्रगती होते. खाकरून नवीन उद्योग-व्यवसाय सुरु करणाऱ्या व्यक्तीने हे रत्न धारण करणे अत्यंत फायदेशीर असते.

 

टायगर रत्न-

टायगर रत्न धारण केल्याने बॅडलक दूर होऊन नशीब फळफळते. या रत्नाच्या मदतीने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतात. शिवाय तुम्हाला आर्थिक धनलाभ होतो. नोकरी-व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी टायगर रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो.

 

नीलम-

नोकरी आणि व्यवसायात यश मिळवण्यासाठी नीलम रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. निळ्या रंगाचे असणारे नीलम रत्न शनी देवाचे रत्न समजले जाते. हे रत्न सर्वांना वापरता येत नाही. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने ठराविक व्यक्तींनाच हे रत्न वापरण्याचा सल्ला देण्यात येतो. या रत्नाच्या मदतीने नोकरी-व्यवसायात सुखसमृद्धी येते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews