Marathi News

नवरात्रीत घराच्या मुख्य दरवाजाजवळ करा फक्त २ बदल, देवी दुर्गा माता होईल प्रसन्न, येईल सुखसमृद्धी

Last Updated:
वास्तु उपायात नवरात्रीच्या नऊ दिवसांत मुख्य प्रवेशद्वारात काही बदल करण्याचे सुचविण्यात आले आहे. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असल्याचे म्हटले जाते.
नवरात्रीत घराच्या मुख्य दरवाजाजवळ करा फक्त २ बदल, देवी दुर्गा माता होईल प्रसन्न, येईल सुखसमृद्धी

Navratri Vastu Tips:   यंदा २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाची सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवस देवी दुर्गा मातेचा उत्सव साजरा केला जातो. हिंदू धर्मातील हा एक अतिशय मोठा सण आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवस देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. भक्त देवी दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्तिभावाने पूजा करत असतात.

नवरात्रीमध्ये देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपायसुद्धा केले जातात. यामध्ये वास्तु उपायांचा आवर्जून समावेश होतो. वास्तु शास्त्र हे अत्यंत प्राचीन शास्त्र आहे. वास्तु शास्त्रात घरातील प्रत्येक वस्तूबाबत काही ना काही नियम सांगण्यात येतात. वास्तु शास्त्राचे हे नियम पाळल्यास घरात सुखसमृद्धी येते असे म्हटले जाते. दरम्यान नवरात्रीमध्येसुद्धा काही वास्तु उपाय केल्यास देवी माता प्रसन्न होऊन सुखसमृद्धीचा आशीर्वाद देत असल्याचे मानले जाते.

वास्तु शास्त्रानुसार घराचा मुख्य प्रवेशद्वार घराचा ऊर्जा केंद्र असतो कारण मुख्य प्रवेशद्वारातूनच सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वार फार महत्वाचे आहे. वास्तु उपायात नवरात्रीच्या नऊ दिवसांत मुख्य प्रवेशद्वारात काही बदल करण्याचे सुचविण्यात आले आहे. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असल्याचे म्हटले जाते. तसेच घरात सुखसमृद्धी आणि आर्थिक भरभराटी येते. जाणून घेऊया हे बदल नेमके काय आहेत…..

 

मुख्य दरवाजाजवळ स्वस्तिक बनवा-

हिंदू धर्मात स्वस्तिकला विशेष महत्व आहे. स्वस्तिकचे चिन्ह बनवणे अत्यंत चांगले समजले जाते. प्रत्येक धार्मिक कार्यात आणि चांगल्या प्रसंगी स्वस्तिकचे चिन्ह बनवले जाते. स्वस्तिकला सुखसमृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे वास्तु शास्त्रानुसार नवरात्रीच्या नऊ दिवसांत तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ स्वस्तिक बनवावे. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. घराला कोणतीही वाईट नजर लागत नाही. तसेच घरात सकारात्मकता येते आणि घरात सुखसमृद्धी येते.

 

मुख्य दरवाजाला तोरण लावा-

वास्तु शास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा घरातील समृद्धीचे प्रतीक असतो. घरात सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा घराच्या मुख्य दरवाजातूनच प्रवेश करत असते. त्यामुळे आपण मुख्य दरवाजा कोणत्या प्रकारे ठेवतो यावर अवलंबून असते. वास्तु शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये घराच्या मुख्य दरवाजावर तोरण लावा. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. घरातील वातावरण प्रसन्न राहते. यामध्ये आंब्याचे पानांचे तोरण लावावे. असे केल्याने घराला वाईट नजर लागत नाही. तसेच देवी लक्ष्मीची कृपादृष्टी लाभून घरात सुखसमृद्धी येते.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews