Dussehra 2025 : दसऱ्याला या वस्तूंचे दान करा; दुःख आणि गरिबीपासून मिळेल सुटका

Published:
Last Updated:
दसऱ्याच्या दिवशी काही वस्तूंचे दान करणेही शुभ मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, विजयादशमीला केलेले दान एखाद्या व्यक्तीला शाश्वत लाभ देते. आ
Dussehra 2025 : दसऱ्याला या वस्तूंचे दान करा; दुःख आणि गरिबीपासून मिळेल सुटका

दसऱ्याचा सण (Dussehra 2025) म्हणजे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. दसऱ्याच्या दिवशीच दुर्गादेवीने महिषासुराचा वध केला होता आणि प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला होता. या दोन्ही दिवसाचे स्मरण दसऱ्याच्या दिवशी केले जाते. दसऱ्याच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करून धन आणि समृद्धीची प्रार्थना केली जाते, तसेच आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना दिली जातात. परंतु तुम्हाला माहितेय का? दसऱ्याच्या दिवशी काही वस्तूंचे दान करणेही शुभ मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, विजयादशमीला केलेले दान एखाद्या व्यक्तीला शाश्वत लाभ देते. आज आपण जाणून घेऊयात नेमक्या कोणकोणत्या वस्तू दसऱ्याला दान करायला हव्यात.

झाडू – Dussehra 2025

झाडू हे धनाचे प्रतीक मानले जाते. झाडू हा घरातील दारिद्र्य आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते. अशावेळी दसऱ्याच्या शुभ मुहूर्ती धार्मिक स्थळी किंवा गरजू व्यक्तीला नवीन झाडू दान केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होते. तुम्हाला धनलाभ होऊ शकतो असं म्हंटल जाते.

पिवळे कपडे आणि मिठाई

ज्योतिषशास्त्रानुसार, दसऱ्याला (Dussehra 2025) पिवळे कपडे दान करणे खूप शुभ आहे. एखाद्या गरीब आणि गरजू व्यक्तीला पिवळे कपडे दान केल्याने व्यवसायातील अडथळे दूर होतात आणि करिअरमध्ये प्रगती होते असे म्हटले जाते.

विवाहित महिलांच्या वस्तू – Dussehra 2025

विवाहित महिलांनी या दिवशी सौंदर्यप्रसाधनांचे दान करावे. यामुळे दुर्गामातेचा आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, तसेच कौटुंबिक जीवनात आनंद आणि समृद्धी मिळते. घरातील नकारात्मकता दूर होते.

दान करताना या गोष्टी लक्षात ठेवा

दान नेहमी ब्राह्मण, किंवा गरजूंना करावे.
या दिवशी तीक्ष्ण किंवा टोकदार वस्तू आणि चामड्याच्या वस्तू दान करणे टाळावे, कारण हे अशुभ मानले जाते.
तुम्ही केलेल्या दानधर्म बद्दल कधीही कोणाला सांगू नये

यंदा कधी आहे दसरा?

दसरा हा साडेतीन शुभ मुहुर्त्तांपैकी एक मानला जातो, त्यामुळे या दिवशी नवीन कामांची सुरुवात करणे शुभ मानले जाते.  यावर्षी दसरा गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. कॅलेंडरनुसार, विजयादशमी तिथी १ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७:०१ वाजता सुरू होते आणि २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७:१० पर्यंत चालते. या वर्षी, दसऱ्याच्या दिवशी दुपारी १:२१ ते ३:४४ पर्यंतचा वेळ अत्यंत शुभ मानला जात आहे. या काळात पूजा, रावण दहन आणि इतर धार्मिक कार्ये केल्याने विशेष पुण्य आणि यश मिळते. विजयादशमी चा दिवस केवळ उत्सव साजरा करण्याचा प्रसंग नाही तर जीवनात सत्य आणि नीतिमत्ता स्वीकारण्याचा आणि सकारात्मक ऊर्जा पसरवण्याचा संदेश देखील देतो.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)