Dussehra 2025 : रावणाने मृत्यूपूर्वी लक्ष्मणाला दिले 3 उपदेश; जे आजही गरजेचे आहेत

Published:
रावण हा एक अत्यंत बुद्धिमान, विद्वान आणि विविध शास्त्रांचा जाणकार होता. त्याने वेद,ज्योतिष, तंत्र, योग यांचा सखोल अभ्यास केला होता. रावणाने त्याच्या मृत्यूपूर्वी, लक्ष्मणाला जीवनाची तीन अमूल्य रहस्ये सांगितली,
Dussehra 2025 :  रावणाने मृत्यूपूर्वी लक्ष्मणाला दिले 3 उपदेश; जे आजही गरजेचे आहेत

रामायण हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. रामायण मध्ये रावण हा राक्षस होता…. सीतेचे हरण केल्यामुळे प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केला…. रावण हा रामायण असला तरी तो शंकराचा मोठा भक्त होता. रावण हा एक अत्यंत बुद्धिमान, विद्वान आणि विविध शास्त्रांचा जाणकार होता. त्याने वेद,ज्योतिष, तंत्र, योग यांचा सखोल अभ्यास केला होता. रावणाने त्याच्या मृत्यूपूर्वी, लक्ष्मणाला जीवनाची तीन अमूल्य रहस्ये सांगितली, जी आजही आपल्याला प्रेरणा देत आहेत. दसऱ्याच्या निमित्ताने (Dussehra 2025) या रहस्यांबद्दल आज आपण जाणून घेऊया.

रावण जेव्हा त्याच्या शेवटच्या घटकामुळेच होता त्या क्षणी भगवान श्रीरामांनी लक्ष्मणाला त्याच्याजवळ पाठवले. जेणेकरून लक्ष्मण रावणाच्या ज्ञानातून काही महत्त्वाचे धडे शिकू शकेल. रावण एक महान विद्वान होता आणि त्याने लक्ष्मणाला जीवनातील तीन सर्वात महत्त्वाचे धडे शिकवले. ही रहस्ये केवळ लक्ष्मणासाठीच नाही तर आजच्या पिढीसाठी देखील महत्त्वाची आणि गरजेची आहेत.

पहिला उपदेश – Dussehra 2025

रावणाने लक्ष्मणाला सांगितले वेळेचा सुज्ञपणे वापर केला पाहिजे. त्याने आयुष्यात खूप काही साध्य केले आहे, पण ते योग्यरित्या सांभाळण्यात करण्यात तो अपयशी ठरला. जर त्याने वेळेत आपली कृती सुधारली असती तर त्याला हा दिवस बघायला लागला नसता. मी श्रीरामांना वेळेवर ओळखू शकलो नाही आणि त्यांच्या शरण येण्यात उशीर केला.हीच माझी मोठी चूक होती असे रावण म्हणाला. Dussehra 2025

दुसरा उपदेश –

रावणाने लक्ष्मणाला दिलेला दुसरा उपदेश म्हणजे वाईट कर्मांपासून नेहमीच दूर राहावे. रावणाने कबूल केले की त्याचे पतन त्याच्या वाईट कृत्यांमुळे आणि अहंकारामुळे झाले. त्याने लक्ष्मणाला समजावून सांगितले की एखाद्याने कधीही वाईटाला आपल्या जवळ करू नये, कारण ते शेवटी विनाशाकडे घेऊन जाते. हे आपल्याला शिकवते की चांगले कर्म हे जीवनातील सर्वात मोठे धन आहे.

तिसरा उपदेश

रावणाने लक्ष्मणाला दिलेला तिसरा उपदेश म्हणजे जीवनात सक्षम सल्लागार असणे महत्वाचे आहे.” रावण म्हणाला की जर त्याने त्याच्या सेवकांचा आणि कुटुंबाचा योग्य सल्ला पाळला असता तर त्याचा अंत इतका दुःखद झाला नसता. हे रहस्य जीवनात योग्य मार्गदर्शन मिळण्याचे महत्त्व प्रकट करते.

रावणाचे हे तीन उपदेश केवळ लक्ष्मणासाठी नाहीतर, तर सध्याच्या कलियुगात सुद्धा योग्य दिशेने पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात. वेळेचा योग्य वापर, चांगल्या कर्मांची शक्ती आणि सक्षम सल्लागारांची गरज – या तीन गोष्टी कोणत्याही व्यक्तीचे जीवन यशस्वी करू शकतात. रावणाचे शेवटचे शब्द आपल्याला शिकवतात की जीवनात योग्य वेळी योग्य निर्णय घेणे किती महत्त्वाचे आहे.