Dussehra 2025 : दसरा विशेष मऊ लुसलुशीत पुरणपोळी, ही रेसिपी नक्की ट्राय करा

Published:
पुरणपोळी ही महाराष्ट्रात एक पारंपारिक आणि सणासुदीला बनवली जाणारी लोकप्रिय गोड डिश आहे. दसऱ्याच्या दिवशी ही खास पुरणपोळी बनवून तुम्ही तुमच्या सणाला एक वेगळी चव देऊ शकता.
Dussehra 2025  : दसरा विशेष मऊ लुसलुशीत पुरणपोळी, ही रेसिपी नक्की ट्राय करा

पुरणपोळी हा दसऱ्यासारख्या सणांसाठी एक उत्कृष्ट मराठी पदार्थ आहे, जो चणाडाळ आणि गुळाच्या पुरणाने बनवला जातो आणि चवीसाठी वेलची व जायफळ पूड वापरली जाते. ही पोळी गुळवणी किंवा तूपासोबत गरमागरम खाल्ल्यास अतिशय स्वादिष्ट लागते. 

साहित्य

  • १ कप चणाडाळ
  • १ कप गूळ
  • पाव कप मैदा
  • पाऊण कप गव्हाचे पीठ
  • चिमूटभर मीठ
  • चिमूटभर हळद
  • पाव चमचा वेलची पावडर
  • पाव चमचा जायफळ पावडर
  • २-३ चमचे साजूक तूप

कृती

  • चणाडाळ शिजवून घ्या आणि नंतर ती गूळ घालून एकत्र उकडून घ्या. 
  • शिजलेली डाळ आणि गुळाचे मिश्रण चांगले घट्ट होईपर्यंत शिजवा. 
  • वेलची आणि जायफळ पावडर घालून मिश्रण चांगले एकत्र करा. 
  • कणकेत मीठ आणि हळद घालून मऊसर पीठ मळून घ्या. 
  • कणकेचा गोळा घेऊन त्यात पुरणाचे सारण भरा आणि जाडसर पोळी लाटा. 
  • पुरणपोळी तव्यावर तूप लावून खमंग भाजून घ्या.