यंदा २ ऑक्टोबर रोजी विजयादशमीचा सण साजरा केला जाईल. या निमित्ताने विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातील आणि देवाला मिठाई आणि प्रसाद अर्पण केला जातो . दसऱ्याच्या दिवशी सोने लुटण्यासोबतच गोडाधोडाच्या जेवणाचा खास बेत घरोघरी केला जातोच. आज आपण अशीच तांदळाची खीरीची रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपी अगदी पारंपरिक आहे. शिवाय खीरही फारच चविष्ट बनते. चला पाहूया तांदळाच्या खीरीची रेसिपी…

साहित्य

  • तांदूळ (बासमती किंवा कोणताही आकाराने छोटा तांदूळ)
  • पूर्ण फॅटचे दूध
  • साखर
  • वेलची पावडर
  • सुकामेवा (बदाम, काजू, मनुका)
  • केशर

कृती

  • तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या आणि १५-२० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. 
  • एका जाड भांड्यात दूध घ्या. दूध पूर्ण फॅटचे असावे. दूध गरम झाल्यावर त्यात भिजवलेले तांदूळ घाला.
  • मंद आचेवर दूध आणि तांदूळ शिजवा. दूध उकळू नये म्हणून सतत ढवळत राहा. दुधाच्या कडेला येणारे मलईचे थर खिरीत मिसळत राहा, ज्यामुळे खीर घट्ट होईल.
  • खीर रबडीसारखी घट्ट आणि दाटसर होण्यासाठी दुधाची संख्या वाढवा आणि जास्त वेळ शिजवा. 
  • खीर बऱ्यापैकी घट्ट झाल्यावर त्यात साखर घाला. 
  • वेलची पावडर, केशर आणि कापलेले सुकामेवा घाला.
  • तुमची रबडीसारखी दाट आणि स्वादिष्ट तांदळाची खीर तयार आहे. तुम्ही ती थंड करून सर्व्ह करू शकता.