Feng Shui Tips to Increase Love Between Husband and Wife:    फेंगशुई शास्त्र आणि वास्तु शास्त्र हे दोन्ही शास्त्र घरात सकारात्मकता वाढवण्यास आणि सुखसमृद्धी आणण्यास मदत करतात. फेंगशुई आणि वास्तु शास्त्र दोन्हीही अतिशय प्राचीन शास्त्र आहेत. वास्तु शास्त्रात घरातील वस्तूंची योग्य दिशा बदलून सुखसमृद्धी आकर्षित केली जाते. तर फेंगशुई शास्त्रात काही वस्तू घरात ठेऊन सकारात्मकता आणि सुखसमृद्धी आकर्षित केली जाते.

फेंगशुई हे एक अतिशय प्राचीन चिनी शास्त्र आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चीन, जपानसारख्या पाश्चिमात्य देशांमध्ये फेंगशुई शास्त्राचा वापर केला जात आहे. तसेच अलीकडच्या काळात आपल्या देशातसुद्धा फेंगशुई शास्त्राचा वापर केला जात आहे. फेंगशुई शास्त्रात सामाजिक, शैक्षणिक, व्यवसायिक, आणि कौटुंबिक आयुष्यातील विविध समस्येवर उपाय सुचविण्यात आले आहेत.

फेंगशुई शास्त्रात पती-पत्नीमधील मतभेद दूर करून नातेसंबंध अधिक घट्ट बनवण्यासाठीसुद्धा काही नियम सांगण्यात आले आहेत. फेंगशुईमध्ये काही वस्तूंचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्याच्या मदतीने पतिपत्नीमधील गैरसमज दूर होण्यास मदत होते. तसेच आपापसांत असलेले वादविवाद आणि भांडणे दूर होऊन प्रेमात वाढ होते. आज आपण पतीपत्नीमधील वादविवाद मिटवून नातेसंबंध मजबूत बनवण्यासाठी बेडरूममध्ये कोणती वस्तू ठेवायची याबाबत जाणून घेऊया….

 

बेडरूममध्ये ठेवा ‘ही’ वस्तू-

बऱ्याचदा पती-पत्नीमध्ये छोटा-मोठे वादविवाद, मतभेद होत असतात. परंतु काही वेळा हे वादविवाद आणि भांडणे सतत होतात. त्यामुळे नातेसंबंधात दुरावा येऊ लागतो. एकमेकांबाबत गैरसमज वाढल्याने अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे अनेकजण फेंगशुई शास्त्राची मदत घेतात. फेंगशुई शास्त्रात पतिपत्नीमधील मतभेद दूर करून प्रेम वाढवण्यासाठी बेडरूममध्ये रोज क्वार्टज हे रत्न ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 

रोज क्वार्टज ठेवण्याचे फायदे-

बेडरूममध्ये रोज क्वार्टज ठेवल्यास पतिपत्नीमधील वादविवाद कमी होतात. गैरसमज दूर होऊन आपापसांतील प्रेम वाढते. नातेसंबंध अधिक मजबूत होतात. एकमेकांच्या भावना समजून घेण्याची क्षमता वाढते.

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)