Marathi News

गणेश चतुर्थीदरम्यान बाप्पासाठी बनवा ‘हे’ नैवेद्य, अडचणी दूर होऊन घरात येईल सुखसमृद्धी

Published:
बाप्पाच्या आगमनाने वातावरण अगदी प्रसन्न झाले आहे. घरोघरी गणपती बाप्पासाठी बाप्पाचे आवडते नैवेद्य बनवले जाते.
गणेश चतुर्थीदरम्यान बाप्पासाठी बनवा ‘हे’ नैवेद्य, अडचणी दूर होऊन घरात येईल सुखसमृद्धी

Ganeshotsav Naivedya Marathi Recipes:   देशभरात २७ ऑगस्टपासून गणेश चतुर्थीला सुरुवात झाली आहे. घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत. बाप्पाच्या आगमनाने वातावरण अगदी प्रसन्न झाले आहे. घरोघरी गणपती बाप्पासाठी बाप्पाचे आवडते नैवेद्य बनवले जाते. गणपती बाप्पाला प्रसन्न केल्याने घरातील सर्व विघ्न दूर होऊन घरात सुखसमृद्धी येते. आज आपण गणपती बाप्पाच्या आवडत्या नैवेद्यांबाबत जाणून घेऊया…

 

पहिला दिवस-

गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवा. बाप्पाला गोड पदार्थ खूप आवडतात.आणि मोदक हा बाप्पाचा सर्वात प्रिय पदार्थ आहे. मोदक नैवेद्यात बनवल्याने बाप्पा प्रसन्न होतात. घरात सुखसमृद्धी येते.आता गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे.

 

दुसरा दिवस-

गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बाप्पासाठी लाडूचा नैवेद्य बनवा. यामध्ये मोतीचूर किंवा बेसनाचे लाडू बनवा. लाडूच्या नैवेद्याने बाप्पा प्रसन्न होतात आणि तुमच्या कार्यातील अडथळे दूर होतात.

 

तिसरा दिवस-

गणेश चतुर्थीच्या तिसऱ्या दिवशी बाप्पासाठी केळीचा नैवेद्य बनवा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.

 

चौथा दिवस-

गणेश चतुर्थीच्या चौथ्या दिवशी बाप्पासाठी गूळ आणि नारळापासून बनणारा नैवेद्य अर्पण करावा. असे केल्याने घरात सुखसमृद्धी येते.

 

पाचवा दिवस-

गणेश चतुर्थीच्या पाचव्या दिवशी गणपती बाप्पाला नैवेद्यात खीर अर्पण करा. असे केल्याने तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यास मदत मिळते.

 

सहावा दिवस-

गणेश चतुर्थीच्या सहाव्या दिवशी बाप्पासाठी नैवेद्य म्हणून मखाण्याची खीर बनवा. यामुळे तुमचे रोग दूर होऊन चांगले आरोग्य लाभते.

 

सातवा दिवस-

गणेश चतुर्थीच्या सातव्या दिवशी गणपती बाप्पासाठी पुरण पोळीचा नैवेद्य अर्पण करा. असे केल्याने आयुष्यातील अडचणी दूर होतात.

 

आठवा दिवस-

गणेश चतुर्थीच्या आठव्या दिवशी गणपती बाप्पाला नैवेद्यात शिरा बनवा. असे केल्याने करिअर आणि व्यवसायात यश मिळते.

 

नववा दिवस-

गणेश चतुर्थीच्या नवव्या दिवशी बाप्पाला नैवेद्यात सुजीचा शिरा अर्पण करा. असे केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात.

 

दहावा दिवस-

गणेश चतुर्थीच्या दहाव्या दिवशी बाप्पाला मोदकाचा नैवेद्य बनवून बाप्पाचे आभार माना.

 

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews