ऋषी पंचमीनिमित्त बनवा पारंपरिक ऋषीची भाजी, तेलाचा थेंबही न वापरता बनणारी रेसिपी

Published:
ऋषी पंचमीच्या सणाला एक खास पारंपरिक भाजी बनवली जाते. ही भाजी काही विशिष्ट भाज्या एकत्रित करून बनवली जाते.
ऋषी पंचमीनिमित्त बनवा पारंपरिक ऋषीची भाजी, तेलाचा थेंबही न वापरता बनणारी रेसिपी

 Rushi Panchami 2025:    २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. तर आज गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी साजरी केली जात आहे. धार्मिक मान्यतेनुसार, ऋषी पंचमी हा सण ऋषी मुनींचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. नुकतंच श्रावण संपून भाद्रपद महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्याच्या शुक्ल पक्षातील पाचव्या दिवशी ऋषी पंचमीचा सण साजरा केला जातो. यंदा आज म्हणजेच २८ ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जात आहे.

धार्मिक मान्यतेनुसार ऋषी पंचमीच्या दिवशी ब्राह्मणांनां दान देण्याची जुनी प्रथा आहे. तसेच ऋषी पंचमीच्या दिवशी उपवाससुद्धा केले जाते. मान्यतेनुसार यादिवशी उपवास केल्याने तुमच्याकडून ज्या चुकून किंवा बुजून चुका झाल्या आहेत. त्या चुका माफ होतात. ऋषी पंचमीच्या सणाला एक खास पारंपरिक भाजी बनवली जाते. ही भाजी काही विशिष्ट भाज्या एकत्रित करून बनवली जाते.

अशी मान्यता आहे कि, ऋषी पंचमीच्या दिवशी नांगर किंवा बैलांच्या पायाचा स्पर्श न झालेल्या भाज्यांपासून भाजी बनवायची असते. यामध्ये काही कंदमुळेसुद्धा वापरली जातात. या सर्व भाज्या एकत्र करून ही मिक्स भाजी बनवली जाते. याला ऋषीची भाजी असेही म्हणतात. आज आपण ही भाजी नेमकी कशी बनवली जाते ते पाहणार आहोत….

 

ऋषीची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

 

लाल भोपळा
अळूची पाने
गाजर
भेंडी
मका
कच्ची केळी
चवळीच्या शेंगा
रताळे
सुरण
हिरव्या मिरच्या
ओलं खोबरं चिंचेचा कोळ
शेंगदाणे- उकडून घेतलेले
चवीनुसार मीठ

 

ऋषीची भाजी बनवण्याची पारंपरिक पद्धत-

ऋषींची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम घेतलेल्या सर्व भाज्या स्वच्छ धुवून चिरून घ्याव्यात.

रताळे किंवा इतर कंदमुळे असतील तर ती पाण्यात उकळून घेऊन कट करावीत.

त्यानंतर आळूची पाने, हिरव्या मिरच्या पॅनमध्ये परतून घ्यावे.

नंतर त्यामध्ये अळूचे देठ, मका, गाजर, चवळी, भेंडी, ओले खोबरे घालून घ्यावे.

त्यांनतर राहिलेल्या सर्व भाज्या घालून त्यामध्ये चिंचेचे कोळ घालावे.

आता त्यात पाणी घालून सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यावेत.

आता १० ते १५ मिनिटे पाण्यात वाफवून चांगले शिजवून घ्यावे.

अशाप्रकारे आपली ऋषी पंचमीची भाजी खायला तयार आहे.

 

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews