मित्रांनो आज अनंत चतुर्दशी … म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ ( Ganesh Visarjan 2025)…. दहा दिवस ज्या गणरायाचे कोड कौतुक केले, पूजा केली, त्याच्या आवडीचे असे खास पदार्थ बनवण्यात आले , त्या गणपती बाप्पाला आज स्नायू अश्रूंनी सर्वांनी निरोप दिला …. गणपती बाप्पा मोरया !!पुढच्या वर्षी लवकर या !!!असा जयघोष करत बाप्पाचे पाण्यात विसर्जन करण्यात आले. परंतु गणपती बाप्पाचे विसर्जन पाण्यातच का केले जातं याबाबत तुम्हाला माहिती आहे का नसेल तर चला आम्ही तुम्हाला सांगतो??
काय आहे महाभारत कनेक्शन?? Ganesh Visarjan 2025
गणपती बाप्पाचे पाण्यातच विसर्जन करण्यामागे थेट महाभारताचा संबंध आहे असं बोललं जातं…पौराणिक कथेनुसार, गणेश चतुर्थीच्या दिवसापासून महाभारताचे लेखन कार्य सुरू झाले असे मानले जाते. महर्षी वेद व्यासांच्या विनंतीवरून भगवान गणेशाने महाभारत ग्रंथ लिहिला होता. असे मानले जाते की महर्षी वेद व्यासांनी सलग 10 दिवस गणेशाला महाभारताची कथा सांगितली आणि गणेशाने सलग 10 दिवस ही कथा लिहिली. 10 दिवसांनंतर, जेव्हा वेद व्यासांनी गणेशाला स्पर्श केला, तेव्हा त्यांचे शरीराचे तापमान वाढलेले होते. यानंतर महर्षी वेद व्यास यांनी गणपती बाप्पाला एका तलावावर नेले आणि त्या ठिकाणी स्नान करून त्यांच्या शरीराचे तापमान थंड केले.
गणपती जल तत्त्वाचा अधिपती-
गणरायाचे विसर्जन पाण्यातच करण्यामागे आणखी एक कारण म्हणजे गणपती बाप्पाला जल तत्वांचा अधिपती मानलं जातं. त्यांच्या विसर्जनाचं मुख्य कारण तर हेच आहे की, अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची पूजा-अर्चा करून त्यांना पुन्हा पाण्यात विसर्जित केलं जातं. म्हणजेच ते ज्याचे अधिपती आहेत तिथे त्यांना पोहोचवलं जातं.
दरम्यान आज सर्वत्र अत्यंत थाटामाटात आणि ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात येत आहे. खास करून मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी रस्त्यावर भाविकांचे मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबईतील सर्वात लोकप्रिय असलेल्या लालबागच्या राजाचा शाही विसर्जन सोहळा सुरु झाला आहे. यावेळी भक्तांची मोठ्या संख्येनं गर्दी दिसत आहे. गणेशभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच लालबागचा राजा आता आपल्या मंडपातून बाहेर पडत असून राजाची शाही मिरवणूक निघणार आहे.






