Ganjanan Maharaj : गजानन महाराज प्रकट दिन विशेष नैवेद्य झुणका भाकरी पाहा रेसिपी…

Published:
साधे, पौष्टिक आणि स्वादिष्ट पिठलं-भाकरी गजानन महाराजांच्या आठवणीत प्रसाद म्हणून आवर्जून बनवले जाते. भक्तांच्या भक्तीभावाने अर्पण केलेला कोणताही साधा पदार्थ त्यांना प्रिय होता.
Ganjanan Maharaj : गजानन महाराज प्रकट दिन विशेष नैवेद्य झुणका भाकरी पाहा रेसिपी…

श्री गजानन महाराज यांना अत्यंत साधे, ग्रामीण आणि विदर्भीय जेवण आवडत असे. त्यांच्या आवडीच्या पदार्थांमध्ये प्रामुख्याने झुणका (पिठलं), ज्वारीची भाकरी. महाराजांच्या आवडीची झुणका-भाकरी बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या…

साहित्य

  • बेसन पीठ
  • कांदा
  • हिरवी मिरची
  • लसूण
  • जिरे-मोहरी
  • कढीपत्ता
  • हळद
  • तेल
  • मीठ
  • कोथिंबीर

कृती

  • कढईत तेल गरम करून त्यात जिरे-मोहरीची फोडणी द्या
  • ठेचलेला लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालून परता. कांदा गुलाबी होईपर्यंत भाजा.
  • हळद आणि चवीनुसार मीठ घाला.
  • बेसन पिठात थोडे पाणी मिसळून गुठळ्या मोडा (किंवा कोरडे पीठ हळूहळू घाला). थोडे पाणी घालून मध्यम सरसरीत मिश्रण करा.
  • तयार केलेले मिश्रण फोडणीत ओता. झाकण ठेवून ५-७ मिनिटे मंद आचेवर वाफ काढा.
  • वरून कोथिंबीर पेरा. गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत हा ‘झुणका’ वाढा

ज्वारीची भाकरी

गरम पाण्यात ज्वारीचे पीठ मळून घ्या. मध्यम आचेवर तवा तापवून थापलेली भाकरी भाजा. दोन्ही बाजूंनी भाजल्यावर कडक भाकरी तयार होते.

मिरचीचा ठेचा

हिरव्या मिरच्या आणि लसूण खलबत्त्यात ठेचून, तेलात परतून चवीपुरते मीठ घालून हा ठेचा बनवतात.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)