गरुड पुराणानुसार, घरातील सदस्याच्या मृत्यूनंतर डोक्यावरील केस कापले जातात. हिंदू धर्मात हा आवश्यक नियम मानला जातो. कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबावर पातक लागतं. जो एक अशुद्ध काळ मानला जातो. त्यामुळे कित्येक घरांमध्ये कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर केस कापण्याची किंवा टक्कल करण्याची प्रथा आहे. आजही अनेक ठिकाणी ही प्रथा पाळली जाते.
टक्कल का केलं जातं?
यादरम्यान कुटुंबातील पुरुष अंत्यसंस्कारानंतर डोक्यावरील केस काढून टाकतात. यातून अशुद्धी संपते अशी मान्यता आहे. मृत व्यक्तीचा भौतिक गोष्टींशी संपर्क तोडण्यासाठी पुरुष सदस्याचं टक्कल केलं जातं. अध्यात्मिक मान्यतेनुसार, मृत व्यक्तीच्या प्रती प्रेम आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी टक्कल केलं जातं. केसांना अभिमान आणि अहंकाराचं प्रतीक मानलं जातं. जेव्हा तुम्ही डोक्यावरील केस काढता तेव्हा तुम्ही एखाद्याप्रती समर्पण आणि त्याग दर्शवता.
हे ही वाचा
याचं वैज्ञानिक कारण असंही आहे की, अंत्यसंस्कारादरम्यान कुटुंबीय मृत शरीराला स्पर्श करतात. ज्यामुळे ते हानिकारक जीवाणूंच्या संपर्कात येतात. हे जीवाणू व्यक्तीच्या केसांवर चिकटतात. अंघोळीनंतरही हे जीवाणू निघत नाहीत. यासाठी जीवाणूपासून बचाव करण्यासाठी केस कापले जातात.
गरूड पुराण काय सांगतं?
तर गरूड पुराणानुसार, आत्मा १३ दिवस घरात असते. यामुळे ती कुटुंबाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते. केसांना नकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्याचा स्त्रोत मानला गेला आहे. त्यामुळे आत्मा केसांच्या माध्यमातून कुटुंबाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे केस कापण्याची किंवा टक्कल करण्याची परंपरा आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)