Which Gemstone to Wear to Increase Love: हिंदू धर्मात रत्न शास्त्रालासुद्धा विशेष महत्व आहे. अनेक लोक विविध अडचणी दूर करण्यासाठी रत्न शास्त्राची मदत घेतात. रत्न शास्त्रात विविध अडचणी दूर करण्यासाठी विविध रत्न धारण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीला एकच रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जात नाही. प्रत्येकाला राशीनुसार वेगवेगळे रत्न सुचविले जातात.
रत्न शास्त्रामध्ये वैवाहिक आयुष्य आणि लव्ह लाईफमधील अडचणी दूर करण्यासाठी आणि नात्यातील प्रेम वाढवण्यासाठीसुद्धा काही रत्न धारण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे रत्न लव्ह लाईफमधील अडचणी दूर करून प्रेम वाढवण्यास मदत करतात. हे रत्न नेमके कोणते आहेत ते जाणून घेऊया…
एमेथिस्ट-
एमेथिस्ट स्टोन लव्ह लाईफमधील अडचणी दूर करण्यास मदत करते. हे रत्न धारण केल्याने भावनिक संतुलन राहते आहे जोडीदारासोबत असलेले मतभेद दूर होण्यास मदत होते. या रत्नामुळे लव्ह लाईफमध्ये सुखसमृद्धी येते. तसेच आपापसांत प्रेम आणि मानसन्मान वाढण्यास मदत होते.
गार्नेट-
जोडीदारासोबत नाते भक्कम करण्यासाठी गार्नेट रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. रत्नशास्त्रामध्ये गार्नेट हे राहूचे रत्न समजले जाते. गार्नेट धारण केल्यास आर्थिक अडचणीदेखील दूर होतात. हे रत्न धारण केल्यास लव्ह लाईफमध्ये रोमान्स वाढते.
सिट्रिन-
सिट्रिन रत्न पिवळ्या रंगाचे असते. हे रत्न सकारात्मकता आणि आनंदाचे प्रतीक असते. हे रत्न धारण केल्याने लव्ह लाईफमध्ये ऊर्जा आणि उत्साह येते. शिवाय हे रत्न सुखसमृद्धी आकर्षित करण्यास मदत करते.
रोज क्वार्टज-
रोज क्वार्टजचे दागिने परिधान केल्याने वैवाहिक आयुष्यातील अडचणी दूर होतात. हे रत्न वैवाहिक आयुष्यात प्रेम वाढवण्यात मदत करते. प्रेम वाढल्याने आपापसांत सामंजस्य वाढते. आणि वादविवाद-भांडणे दूर होतात. वैवाहिक आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने हे रत्न धारण करता येते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)






